मुल जन्माला पासून आई, आजी, आजोबा, वडील, मामा, मावशी, आत्या, काका त्या मुलाने पुढे चालून मोठं झाल्यावर काय व्हावे किंवा त्याने काय करावे या साठीच्या अपेक्षा व्यक्त करतात. मूल थोडे बोलायला लागले की मग त्याला प्रश्न विचारतात मोठा झाल्यावर तू काय होशील? इंग्रजी मीडियम मधला मुलगा असला तर सांगतो. I don’t now. कारकीर्द किंवा करिअर काय असतं हे समजून घेण्यासाठी त्यावर आधारलेला थ्री इडीयट्स हा बहुचर्चित पुरस्कार प्राप्त चित्रपट आहे.
कारकीर्द किंवा करिअर निवडणे ते करणे एक फार मोठे आयुष्यभराचे आव्हान प्रत्येक व्यक्ती सोबत घेऊन चालतो. करिअरच्या माध्यमातून ती व्यक्ती सर्व स्तरावर यशस्वी बनण्याचा सातत्याने प्रयत्न करते आनंद घेणाचा आणि देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. करिअर निवडीच्या बाबतीत साधारणता दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन नंतर हे टर्निंग पॉईंट ठरविणारे आयुष्याला वळण देणारे महत्त्वाचे टप्पे ठरतात. कारकीर्द निवड आणि विकासासाठी मानस -शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने मुलांच्या गुणवैशिष्ट्यांचे मापन व अनुरूप प्रारूप सांगितले त्याचबरोबर सुपर यांचे वैकासिक प्रारूप आहे.
मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या क्षमता आभीक्षमता, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, यासारख्या सुप्त गुणांचे मापन करण्या साठीच्या वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्या या विश्वासनीय आणि वैध आहे. हॉलंड यांनी करिअर निवडीसाठी स्व दिशा शोध सेल्फ डिरेक्ट स्व गुणांकन करणारी चाचणी शोधली आहे.
सध्या बदलत असणारे शैक्षणिक धोरण आणि शिक्षणाबाबत नवनवीन राबविल्या जात असणाऱ्या पॉलिसी या प्रामुख्याने कौशल्य भिमुख आणि सृजनशील करिअर बनविण्यासाठी त्या मुला मुलींना उपयुक्त ठरतील अशा पाठ्यक्रमाचे निर्मिती करण्या साठी त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न आहे. त्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. करियर बाबत मुला-मुलींना अधिक व्यवसाय भिमुख बनविण्या साठीचा भर हा आहे. प्रामुख्याने करिअर बाबत बोलायचे झाले तर मुलं आणि मुली या विशिष्ट पदांसाठी आवश्यक असणारी पात्रता ही त्यांच्याजवळ असते.परंतु संपूर्ण भारतात मधून महाराष्ट्र राज्य हे बेरोजगारीच्या बाबतीत तेराव्या स्थानावरती आहे. पात्रता आणि क्षमता असून देखील बेरोजगारीचा भस्मासुर हे वास्तव आहे. त्यावर उपाय म्हणून शिक्षण सुरू असताना इतर प्रकारचे कौशल्य आत्मसात करणे. आपले पिढी जात व्यवसाय आणि कौशल्य आत्मसात करून ते व्यवसाय स्वीकारणे, प्रयत्न आणि प्रमादा पद्धतीने छोटे छोटे उद्योग मित्रांनी समूहाने तयार करणे, समाजात सातत्याने ज्ञानी आणि अनुभव संपन्न व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे. प्रामुख्याने युवकांसाठी करिअर करणे म्हणजे आर्थिक उत्पन्नाचे कुठले तरी स्त्रोत हे सुरू होणे हे आहे. त्यानंतर मग बाकीच्या सर्व गोष्टी या येतात त्यात मग प्रतिष्ठा, समाज मान्यता, आर्थिक मोबदला, काम केल्यानंतर मिळणारा मोकळा वेळ, कामाच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या इतर प्रकारच्या सुविधा, त्या ठिकाणचे मानसिक, पर्यावरण, विषयक वातावरण आणि संघटनाबाबतची शिस्त धोरणे, यासारख्या कितीतरी घटकांचा युवकांच्या करिअरवर चांगले वाईट परिणाम हे होताना दिसतात.
सध्या करिअर करण्याबाबतचे जॉब म्हणजे मेडिकल इंडस्ट्रीज, बँकिंग सेक्टर, सिक्युरिटी सेक्टर, इंटेलिजन्स, टीचिंग प्रोफेशन, डेटा सायंटिस्ट, रेल्वे, राज्यसेवा, लोकसेवा, केंद्रीय सेवा, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, एग्रीकल्चर ईस्ट, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी, फॉरेस्ट एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, न्यूट्रिशन लिस्ट अँड अल्टरनेटिव्ह थेरपीस्ट, मॅनेजमेंट कन्सल्टंट, न्याय क्षेत्रात वकिली, त्याच्याशी संबंधित इतर सेवा, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज, फ्रुट प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, डिफेन्स सर्विसेस, मार्केटिंग मॅनेजमेंट, बांधकाम व्यवसायाशी संबंधित, डिजिटल मार्केटिंग, अभिनय क्षेत्र, समाज सेवा, एनजीओ मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटंट, मीडियाशी संबंधित संपादक, युट्युबर, त्याचबरोबर सेल्फ लघुउद्योग धंदे यासारख्या कितीतरी क्षेत्रांमध्ये युवकांना करिअर करण्याची संधी आणि पर्याय आहे.त्यासाठी मात्र त्याला त्याच्या पात्रता आणि संबंधित परीक्षा या पास कराव्या लागतात यासाठी मोठ्या प्रमाणात जीव घेण्या स्पर्धेला अशा युवकांना सामोरे जावे लागते. एक चांगला आणि सर्वोत्तम पर्याय म्हणजे समाज सेवेतून लोक नेतृत्व कौशल्य विकसित करणे लोक नेतृत्व करणे हे आहे. भारतात आजही नेता हा ध्येय धोरण उद्दिष्ट ठरविणारा कायदे करणारा हा आहे. त्यासाठी कुठल्याही पद्धतीची फार जास्त शिक्षणाची अट ही नाही. ती व्यक्ती फक्त भारताचा एकनिष्ठ प्रामाणिक नागरिक असणे पुरे आहे. खरोखरच आज भारतामध्ये उत्कृष्ट नेत्यांची कमतरता ही आहे ही वस्तुस्थिती आहे.
आता खरा प्रश्न उद्भवतो तो आमच्याकडे पात्रता आहे, क्षमता आहे, कौशल्य आहे, पण संधी आणि मागणी नाही.किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर आम्ही बेरोजगार आहे. अशांसाठी लेखक प्रामुख्याने शासनाला, समाजाला युवकांना मार्गदर्शित करतात की रिकामा वेळ हा कोट्यावधी रुपयांच्या संपत्ती पेक्षा मौल्यवान आहे. ज्याच्याकडे वेळ आहे तोच खरा विद्यावान आहे. या वेळेचा सदुपयोग करून घेऊन आपण जागतिक, राष्ट्रीय किर्तीचे, व्यक्तिमत्व हे निश्चित बनवू शकतात अशा संपूर्ण युवकांसाठी शासनाने प्रामुख्याने त्यांना राजस्थानच्या धरतीवर बेरोजगारी भत्ता विधेयक हे विधिमंडळांमध्ये संमत करून त्यांना हात खर्च करण्यासाठी पैसे हे ठराविक वयोमर्यादेपर्यंत दिले पाहिजे. अशा युवकांना इतर कार्यालयांमध्ये थोडा बहुत त्यांच्या पात्रते आणि क्षमतेनुसार काम देऊन त्याचा मोबदला हा दिला पाहिजे. शिवाय शासन हे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण या धोरणाला प्रोत्साहन देत आहे. कुठल्याही पद्धतीचे शासकीय पद हे भरल्या जात नाही. कायदा आणि सुव्यवस्थेशी, संरक्षणाशी संबंधित, हजारो पदे ही रिक्त आहे.
करियर करणे म्हणजे अमाप पैसा कमावणे नव्हे तर स्वतःचा सर्वांगीण विकास करीत सामाजिक आणि राष्ट्रीय उन्नतीसाठी आपला हातभार लावणे मानवतावादी दृष्टिकोनातून कार्य करणे की ज्याची दखल ही व्यक्ती राष्ट्रांसोबतच इतर सजीव पाळीव प्राणी हे घेतील. करियर करणे म्हणजे आत्मिक समाधान,शांतता, आरोग्य, परिवार, आनंद, उत्साह समाज मान्यता मिळविणे, मोकळा निर्भीडपणे श्वास घेणे होय. करिअर हा विषय फक्त लेखनामधून मांडण्यासाठी चा नाही करियर ही निरंतर चालणारी व्यक्ती विकासाची प्रक्रिया आहे. यासाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपूर्ण एक ते दोन दिवसांसाठीच्या या आयोजित केल्या जातात. सध्याच्या काळात करिअरच्या मागे मुलं आणि मुली हे त्यांची युवा अवस्थाच हरवून बसत असल्याचे प्रामुख्याने सातत्याने मोठ्या प्रमाणात निदर्शनास येते.
प्रा. डॉक्टर आशिष एस जाधव (बडगुजर)
पंकज कला वरीष्ठ महाविद्यालय चोपडा ९४७३६८१३७६