राज्यातील ३८ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ जाहीर

ता. ५ सप्टेंबर २०२४ : शिक्षक ध्येय, सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड; हिंद एज्युकेशन सोसायटी दापोली जि. रत्नागिरी आणि श्री. मिलिंद दीक्षित, उपसंपादक, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील या स्पर्धेमागे शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच मुख्य उद्देश होता. शिक्षकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली गेली आहे.

राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

अ) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी)

ब) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत)

अ आणि ब गटातील एकूण ३८ विजेत्या शिक्षिका, शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.

श्री. मुकुंद मारुती दहिफळे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जि. अहमदनगर आणि श्री. बजरंग गोविंदराव बोडके, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेतील विजेते – पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

येथे क्लिक करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button