आई बाबा
आम्ही काय
तुम्हाला जन्मभर पुरवणार
आहात का…..?
असं आई सहज
म्हणून गेली….
ऐकून हे माझ्या काळजात
आरपार एक कळ निघून गेली…….
त्रिवार सत्य होतं. पण,
पटतच नव्हतं मनाला….
कधीच विसरणार नाही
आपण त्यांच्या सोबतच्या क्षणाला…….
आई बोलून गेली. पण,
वडील पाहून हसत होते…….
खरं सांगू का,
तेव्हा ते दोघेही मला
विठ्ठल रुक्मिणीच..
वाटत होते…….
लेकरांच्या सुखातच
त्यांचे सुख असतं
दडलेलं…….
जग दाखवलं
तुम्ही आम्हाला
किती छान
बनवलं……..
आपण सुंदर शिल्प असतो,
त्यांच्यात हातून घडलेलं….
आई वडील म्हणजेच
घरातील चालते बोलते
देव आहेत…
गीतांजली दत्तात्रय डोळस
शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूल, शारदानगर तालुका बारामती, जिल्हा पुणे