
शिक्षकांनी नोकरीत असतांना कोणता ही दुसरा व्यवसाय करु नये. उदा. दुकान काढणे, काहीतरी विकणे, काहीतरी बनविणे, काहीतरी वितरण करणे, शेती, उद्योग करणे इ. आपण स्वत: करु नये. त्यामुळे आपल्या शिक्षकीपेक्षावरील निष्ठा कमी होते. अपेक्षित असलेला शिक्षक विद्यार्थ्यांना मिळत नाही. पुर्ण पगार घेता मग इतर उद्योगधंदे करण्याची बिलकुल गरज नाही ते करु नये.
आदर्श शिक्षकाने काही नियमावलीचे पालन केले अथवा त्याचा विचार केला तर त्यांचे जीवन आनंदाची बाग होईल.
१) शिक्षकाने पंचनिष्ठा नेहमी बाळगावी. अ) व्यावसायनिष्ठा ब) विद्यार्थी निष्ठा क) विज्ञाननिष्ठा ड) समाजनिष्ठा इ) राष्ट्रनिष्ठा
२) शिक्षकाने स्वत:ची स्वतंञ लायब्ररी तयार करावी. त्यात अनेक प्रकारची वाचनीय पुस्तके असावी
३) शिक्षकाने आपल्या वैयक्तिक राहणीमानाकडे, टापटीपपणाकडे जाणीवपुर्वक लक्ष द्यावे. कारण विद्यार्थी अनुकरण प्रिय असतात
४) जर पर्मनंट शिक्षक असेल तर त्याने दरवर्षी एक मुलगा व एक मुलगी यांना दत्तक घेऊन त्यांच्या फी भरण्यापासुन ते स्कुल ड्रेस, सहल व शैक्षणिक उपक्रम फी स्वत: भरावी. ते विद्यार्थी स्वत:च्या वर्गातले न घेता. दुस-या इयत्तेचे घेणे. पण स्वत:च्या शाळेतील विद्यार्थी दत्तक घ्यावे. दरवर्षी विद्यार्थी बदलत जावे
५) विविध उपक्रमात स्वत:बरोबर विद्यार्थ्यांना सहभागी करावे. त्याना मार्गदर्शन व प्रोत्साहान द्यावे
६) प्रत्येक शिक्षकाने आद्यवत संगणक ज्ञानाचे रितसर प्रशिक्षण घेऊन, संगणक ज्ञान हे पुर्ण घ्यावे. ज्यामुळे जगातील नवीन ज्ञानाशी सर्तक राहता येते
७) आपला सदैव उत्साह शाळेत व वर्गात राहण्यासाठी व आपल्या स्वत:च्या आरोग्यासाठी योगासन अथवा थोडा तरी व्यायाम रोज करावा
८) कोणत्याही विषयांचे आपण शिक्षक असाल तरी आपण मराठी भाषेचा अभ्यास,आवड ठेवावी. ज्ञान आत्मसात करावे. महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेक शिक्षकांनी माय मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे
९) आपल्या उत्पनातील फक्त दोन टक्के भाग हा समाज्यासाठी द्यावा. उदा. शंभर रुपये जर कमविले असतील तर त्यातील दोन रुपये समाजासाठी, सामाजिक उपक्रमांना द्यावे. आणि ते स्वत:च्या हातानेच खर्च करावे.

१०) आपण स्वत: प्रत्येक शिक्षकाने दहा दिवसांचे विपशन शिबीर करावेच. नोकरदार वर्गास दहा दिवस व पुर्ण पगारी सुट्टीचे दहा दिवसांचे विपशन शिबिर करता येते. त्या दिवसांचा पुर्ण पगार मिळतो. तसा जीआर पण आहे. यामुळे आपल्या वर्तनातील ञागा, राग आणि चिडचिडेपणा कमी होऊन, आपणांस चांगले अध्यापन करुन अध्यापनाचा आनंद घेता येतो
११) शिक्षकांनी नोकरीत असतांना कोणता ही दुसरा व्यवसाय करु नये. उदा. दुकान काढणे, काहीतरी विकणे, काहीतरी बनविणे, काहीतरी वितरण करणे, शेती, उद्योग करणे इ. आपण स्वत: करु नये. त्यामुळे आपल्या शिक्षकीपेक्षावरील निष्ठा कमी होते. अपेक्षित असलेला शिक्षक विद्यार्थ्यांना मिळत नाही. पुर्ण पगार घेता मग इतर उद्योगधंदे करण्याची बिलकुल गरज नाही ते करु नये
१२) आपल्या सर्व सहकार्यांबद्दल आदराची व सन्मानाची तसेच सहकार्याची भावना सदैव असावी.
१३) विविध प्रशिक्षणे स्वत: घेत जाणे. शासकीय तर असतातच, पण वैयक्तीक ही प्रशिक्षण घ्यावी. उदा. संवादकौशल्य, निवेदन, पेटींग, कॅलेग्राफी, संगणक, हस्तकला, स्केचिंग, लेखनकौशल्य, हस्ताक्षर, रांगोळी, फोटोग्राफी इ. एखादी कला आत्मसात करावी
१४) नोकरीवर जाताना अगोदर मनाची प्रसन्नता मनात ठेवून रोज शाळेत जावे. मनात वरील दिलेल्या पंचनिष्ठा सदैव पाळाव्या
१५) ज्या संस्थेत शिक्षक म्हणुन काम करत आहात. मग ती खाजगी, सरकारी, निमसरकारी संस्था असो, तिच्याबद्दल आदराची भावना नेहमी मनात असावी. संस्थेच्या विकासात योगदान देत रहावे
१६) स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेत जाणे. आपल्या मुलांनाआदर्श संस्कारी व देशसेवेच्या दृष्टीने दृष्टीकोन देऊन घडवावे. अनेक शिक्षकांच्या कुटुंबाच्याबद्दल अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणुन हा मुद्दा येथे घेतला आहे. आपले सर्व कुटुंब सदस्य यांच्याशी नेहमी प्रेमपुर्वक, स्नेहभाव, आदरभाव जपणारे नाते सदृढ करावे.

१७) फक्त परमंन्ट शिक्षकांनी वयाच्या ५० व्या वर्षी सेवानिवृत्ती घ्यावी. सरकार तुम्हाला ५८ वर्षी निवृत्त करत असली तरी ही आपण स्वच्छा निवृत्ती घ्यावी. कारण आपले राहिलेले आयुष्यमान आपणांस आनंदाने जगता आले पाहीजे. निवृत्ती नंतर खरे जीवन जगायचे राहुन जाते. ५० व्या वर्षी रिटायडमेंट घेतल्यामुळे आपल्या मुलांच्या करीअरकडे पुर्णपणे लक्ष देऊन, त्याला आयुष्यात स्थिर होण्यासाठी आपली मदत आवश्यक आहे. तसेच ५० नंतर आपली शारिरीक क्षमता, उत्साह आणि काम करण्याची उमेद संपुन गेलेली असते. त्यामुळे असा दुबळा शिक्षक विद्यार्थ्याना नको आहे. आपले आयुष्यमान WHO संघटनेने खुप कमी राहीलेले सांगितले आहे. आपण आता जास्त वर्ष जगणार नाहीत, म्हणजे ७०च्या पुढे नाहीच. त्यामुळे फक्त नोकरी करण्यासाठी आपला जन्म झाला नाही. निवृत्तीनंतर अनुभव कथन, आपले विचार लेखनातुन मांडा, विविध अनेक विद्यार्थ्यांना अनुभवाचे श्रीफळ वाटा. ज्ञान वाटत राहा. त्यामुळे आपले जीवन सुखकर होईल
१८) नोकरीच्या धावपळीमुळे आपली बायको, मुलगा, मुलगी, आई, बाबा, घर परीवारातील नातेवाईक यांना वेळ देता आलेला नसतो. त्यांना आपण वेळ द्या. त्यामुळे रक्ताची नाती निरोगी होईल. अथवा समाजाचा विकास न कळत होईल
१९) निवृत्तीनंतर अनेक देश फिरायला जा. अनेक भारतातील सुध्दा, महाराष्टातील सुध्दा निसर्ग अनुभवत फिरायला जा. त्यामुळे आपले जीवन चैतन्यमय जगता येईल. समाजाला एक आदर्श नागरिक मिळेल
२०) राष्ट्रभक्ती, राष्ट्रभिमान प्रत्येकाच्या नसा-नसात फुलविण्याचा प्रयत्न करा. शिक्षकांनी समाजाचे नेतृत्व केले पाहीजे, बघा,जेवढे जमतय तेवढे करा. पण सगळचं करावे. अशीच माफक अपेक्षा आहे. शिक्षकांची जीवनशैली वरील मुद्यांप्रमाणे असावी म्हणजे तोच खरा शिक्षक आपण म्हणु शकतो.
शिक्षक राष्ट्राचा कणा आहे. राष्ट्र उभारणीचे महान काम शिक्षकांच्या हातुन होते. जेथे शिक्षकांचा बहुमान, तोच देश ठरतो महान. म्हणुन शिक्षकांनी आपल्या जीवनाचे सोने करावे.
चला..५० शी नंतर रिटायरमेंट पक्की घ्या..!
आणि जीवन आनंदाने जगा..!
शिक्षणतज्ञ राजेंद्र सोनवणे
(कवी वादळकार)
पुणे ९६५७३४८६२२
पुन्हा पुन्हा अभिनंदन सर,खुप खुप छान लेख,सदर पोस्ट वाचून अनेक शिक्षकांचे सोने होईल.यात तिळमात्र शंका नाही. खुप खुप धन्यवाद सर🙏🙏