असा असावा शिक्षक…

काळानुरूप शिक्षणांची धुरा सांभाळणारा व्यक्तिमत्त्व म्हणजे शिक्षक

गुरू शिष्य परंपरा भारतीय संस्कृती मधील एक महत्व पुर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनातील पहिले गुरू आई वडील असतात कारण या सुंदर जगात आण्याचे श्रेय त्यांना जातो भारतात प्राचिन काळापासून गुरू शिष्य परंपरा असून शिक्षक हे विद्यार्थ्यांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशे कडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनिअर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रां मध्ये प्रगती करुन देशाचे नाव उंचावणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते.

         शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व जेवढे प्रभावी परिणाम कारक ज्ञान समृध्द असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकाने आपले ध्येय समजले पाहिजे. स्वतः मधिल उणिवा जाणिवपूर्वक दुर करणारा शिक्षक आपले अध्यापनाचे कार्य अधिक प्रभावी रंजक आणि सुलभपणे करु शकतो.

विनोबा भावेनी शिक्षणावर भाष्य करताना फार मार्मिक सुत्र सांगितले आहे ते म्हणतात, “शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाज निष्ठ असावा आणि समाज समता निष्ठ असावा.” शिक्षक जर विद्यार्थी निष्ठ असेल तर कळ्यांचे फुलांत रुपांतर करू शकतो. पाठ्यपुस्तका बरोबर उघड्या जगाचे पुस्तक ही शिकवतो. चांगल्या विद्यार्थी निष्ठ शिक्षक हा सहवासातून, संवादातून, आचरणातून, चारित्र्यातुन मनाची श्रीमंती कसलेला कर्तबगार विद्यार्थी घडवु शकेल, घडवु शकतो आणि तो आपल्या पंचेंद्रीयांना ज्ञान सन्मुख करून जीवनाला समृध्द करणारया संस्कृतीची ही तो पेरणी करू शकतो. खरेतर त्यातुनच साक्षर मतदार निर्माण करित नाही तर तो कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण करतो.

       विद्यार्थी जसा निव्वळ परिक्षार्थी असता कामा नये तसा शिक्षक ही निव्वळ अर्थार्जनाजे साधन म्हणून क्षेत्रा कडे पाहणारे असता कामा नये. शिक्षक असण्याची पहिली अट विद्यार्थी असणे हीच आहे. शिक्षक केवळ ‘ पोपटपंची ‘ करणारा प्रश्नांना वावच न देणारा असेल तर अर्थ पुर्ण ज्ञान- व्यव्हार संभवणारा नाही. शिक्षक विद्यार्थी परस्पर पुरक असावेत. चांगल्या शिक्षक विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करतो माहिती तंत्रज्ञानाचा ‘ विस्फोट ‘ झालेल्या काळात विद्यार्थी पुर्वी सारखा माहिती साठी शिक्षकांवर अवलंबून राहिलेला नाही. माहिती देण्यासाठी सुसज्ज वाचनालया पासून ते इंटरनेट पर्यंत अनेक साधने आज सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. त्या साधनांची योग्य ती दिशा त्यांना खुली करून द्यावी लागेल विद्यार्थी त्या मुळे भटकणार नाही. माहिती व्यवस्थापन करत कुतुहल व जिज्ञासा जागृत करण्याचे काम शिक्षकांचे आहे. झपाट्याने बदलणाऱ्या काळात सतत अद्ययावत राहणे हे शिक्षकांसाठी देखील गरजेचे बनले आहे. काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक विद्यार्थी दोघांना आता स्वतःला परस्पर पुरक व समर्थ केलेच पाहिजे. शिक्षक आपल्या विषयात निष्णात असावा विषयावर त्याची पकड असावी. शिक्षक इतर बाबतीत विद्वान असो वा नसो आपल्याला जे शिकवायचे आहे त्या विषयात तो विद्वान असलाच पाहिजे. आपल्या विषयाच्या अनुषंगाने नवनवीन ज्ञान मिळवुन विभिन्न शैक्षणिक साहित्याचा अवलंब करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे आणि आपली तासिका प्रसन्न चित्ताने शिकविल्या की विद्यार्थी नक्कीच शिकतात या उमलत्या कळ्यां मधील आंतरिक शक्तींचा स्फुलिंग शिक्षकांनी चेतविला पाहिजे.

आजचे युग हे संगणकाचे युग आहे कुठल्या ही नव्या परिवर्तनाच्या आणि संक्रमणा मागच्या शक्तींचा उगम प्रभावी शिक्षण हे माहीती व तंत्राधिष्ठीत आहे. आपण शाळांमध्ये परिक्षार्थी तयार करण्या पेक्षा खरे ज्ञानकांक्षी,  विवेकनिष्ठ प्रयोगवीर तयार होण्यासाठी प्रत्येक शाळा ही साक्षात प्रयोगशाळा झाली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या वाट्याला आलेली काम कुशलतेने, आनंदी वृत्तीने, बिनचूकपणे वेळेत आणि नियमांच्या अधीन राहून करायला हवे. बुद्धीवादी शक्ती या भुमिकेतुन प्रत्येक शिक्षकांने नवनवीन अध्यापन तंत्राचा अवलंब करून विषयात प्रत्यक्ष जीवनाशी असणारा संबंध स्पष्ट करावा आणि शिक्षण हे खरया अर्थाने जीवन शिक्षण बनावे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग असल्याने शिक्षकांने स्वतःला अद्ययावत ठेवणे संगणकाशी जुळणे तंत्रस्नेही असणे आवश्यक आहे.

           आजच्या आॉनलाईन जगात प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस उपलब्ध आहे. युटयुब वरचे व्हिडिओज, विकिपीडिया सारखे माहितीचे संग्रह इथपासून ते अनंत ब्लॉग आणि माहितीचे संकलन करणाऱ्या वेबसाईटस उपलब्ध आहे असे असताना अध्यापनासाठी फक्त पाठ्यपुस्तकावर अवलंबून राहणे हे शिक्षण मर्यादित चाकोरीमध्ये अडकून ठेवण्या सारखे आहे. अशी साधनांचे स्वतः वापर करून मुलांना वापरायला प्रोत्साहन दिले पाहिजे. आदर्श शिक्षिकाचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे शिक्षक हा वाचनप्रिय असावा. वाचनाचा व्यासंग त्याला असावा विषयांसह इतर अवांतर वाचन शिक्षकांनी करायलाच पाहिजे स्वतःचा ग्रंथ संग्रह असणे आवश्यक आहे. आपले ज्ञान अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे कामात निर्माण होणारे कोणतेही प्रश्न हाताळण्याची सुत्रे आपल्या उपलब्ध होतात. शिक्षकाने नेहमी चिंतनशील असावा कोणत्याही समस्येची उकल होण्यासाठी सखोल चिंतनाची आवश्यकता आहे. शिक्षकांने चर्चा करण्याची आवश्यकता आहे.

           मुलांमध्ये सदैव रमणारे साने गुरुजी म्हणतात, ” जो मुलांना पावसात भिजायला शिकवतो, आकाशाशी दोस्ती करायला शिकवतो तो खरा शिक्षक. ” नाहीतर विद्यार्थ्यांना गणिताची सुत्रे येतात पण त्या मागची तर्क संगती समजत नाही मग आयुष्यात तो विसंगतीचाच पाठपुरावा करतो. विद्यार्थी कविता शिकतात पण त्यातील सौंदर्य त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही. विज्ञानाचे प्रयोग करतात पण त्या मागील विज्ञाननिष्ठा रुजत नाही म्हणून शिक्षक हा मुळातच संवेदनशील हवा. शिक्षकांनी आपल्या समाजातील प्रतिमेला तडा जाणार नाही आपल्या सुखदुःखाचा, मानअपमानाचा लवलेशही विद्येच्या प्रांगणात प्रतिबिंबित होणार नाही याची दक्षता घेतली तरच ज्ञानदानाचे पवित्र कार्य तेवढ्याच तन्मयतेने उत्कृष्ट पार पडेल. थोडक्यात माझ्या शिक्षकांसाठी दोन ओळी….

प्रेमाचे शब्द, स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर, कौतुकाची थाप

सदैव मदतीचा हात असे आहेत आमचे गुरुजी खास

गज़ाला तबस्सुम सैय्यद असगर अली

शाळेचे नाव:- जिल्हा परिषद उर्दु केंद्र शाळा नं.१ रावेर जिल्हा:- जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button