रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका

मुखपृष्ठावर झळकण्याची संधी

 

शिक्षक ध्येय महाराष्ट्र आणि मातृसेवा फाउंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंकाया अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो – सेल्फी नेहमीच काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो – सेल्फी काढून पाठवायचा. तुम्ही पाठविलेला सेल्फी साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये राज्यस्तरावर प्रसिद्ध केला जाईल. ही नवी भन्नाट आणि अभिनव कल्पना लढवून लोकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी उभं करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.‌

 ‘एक रोपटं लावा’ त्या रोपट्यासोबत सेल्फी किंवा फोटो काढून खालील व्हॉट्स ॲप  नंबरवर पाठवावा…

96 23 23 71 35

 ही स्पर्धा नि:शुल्क असून सर्वांसाठी खुली आहे. याचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.

1) झाड देशी असावे.

2) रोपटं लावतांनाचा फोटो – सेल्फी  काढतांना उभा मोबाईल धरावा.

3) संपूर्ण रोपटं आणि आपला चेहरा दिसेल असा सेल्फी किंवा फोटो असावा.

4) सेल्फी किंवा फोटो सोबत आपली खालील माहिती पाठवावी : संपूर्ण नाव, वय, इयत्ता, संपूर्ण पत्ता, व्हाट्स ऍप नंबर, कोणते झाड लावले त्याचे नाव, इ माहिती आवश्यक आहे.

5) तुम्ही पाठविलेला फोटो – सेल्फी साप्ताहिक शिक्षक ध्येयमध्ये राज्यस्तरावर प्रसिद्ध केला जाईल.

6) उत्कृष्ट, सुंदर आणि ओरिजनल सेल्फी (फोटो) पाठविल्यास तो कव्हरवर घेण्यात येईल.

7) दिनांक 02, 09, 16, 23, 30 जूनच्या साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये आपला सेल्फी राज्यस्तरावर प्रसिध्द करण्यात येईल.

8) मागील वर्षांचा जुना सेल्फी, कुंडीतील रोपटं नको. कुठलीही बनवेगिरी, खोटेपणा करू नये, केल्यास तो फोटो बाद करण्यात येईल. शिक्षक ध्येयचे उपसंपादक, उपसंपादिका किंवा प्रतिनिधी रोपटं लावलेल्या स्थळाला भेट देऊ शकता.

9) रोपट्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी.

10) या स्पर्धेसाठी को णतीही फी नाही. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

12) अंतिम निकाल, विजेत्यांची नावे 30   जूनच्या शिक्षक ध्येयच्या अंकात प्रसिद्ध केली जाईल.

13) बक्षीस म्हणून विजेत्यांना शिक्षक ध्येयचे ५१ डिजिटल अंक आणि ५१ शालेय नवोपक्रम त्यांच्या व्हॉट्स ॲप नंबरवर पाठविण्यात येईल. 

14) परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत असलेलं तापमान, कमी होणारं पर्जन्यमान, रुसलेला वरुणराजा आणि आग ओकणारा सूर्य.. या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. लोकांना झाडं लावण्यासाठी उद्युक्त करणे हाच या मोहिमेचा उद्देश आहे. तसेच झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा हेतू असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणणे. प्रत्येक माणसाच्या मनात झाडं लावण्याचा विचार रुजवण्याचा हा एक प्रयत्न असल्यामुळे या स्पर्धेत राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक यांनी उत्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन मातृसेवा फाउंडेशन, ठाणे आणि शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button