उच्च शिक्षण अधिक पारदर्शक पद्धतीने घेता यावे व उच्च शिक्षणात कोणतीच उणीव राहू नये म्हणुन २०१७ मध्ये, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्च शिक्षणात प्रवेशासाठी एकल, स्वायत्त आणि स्वतंत्र एजन्सी स्थापन करण्याची घोषणा केली. प्रवेश परीक्षा दोषमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने याची स्थापना केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आणि १ मार्च २०१८ रोजी NTA म्हणजेच राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) अस्तित्वात आली. परंतु गेल्या काही दिवसांत देशातील दोन प्रमुख परीक्षांमध्ये (NEET UG आणि UGC NET २०२४) पेपर फुटल्याची प्रकरणे समोर आली आहेत. युजीसी नेट जून २०२४ च्या पेपर लीकचा मुद्दा समोर आला असताना नीट यूजी वरील लढा अद्याप थांबलेला नाही. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. नीट व नेट चे पेपर लीक होण्या आधी देखील पेपर फुटीच्या अनेक घटना समोर आल्या मात्र सरकारने एन टी ए विरुध्द कारवाई का केली नाही? सरकारने व शिक्षण विभागाने तेव्हाच अशा घटनांना आळा घातला असता तर परत पेपर फुटीच्या घटना घडल्या नसत्या. मात्र याला सरकारची निष्क्रियता जबाबदार आहे.
या एजन्सीची स्थापना देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्याच्या आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, कार्यक्षम आणि न्याय्य करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. एनटीए भारतातील विविध विद्यापीठे आणि संस्थांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी १५ राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आयोजित करते. विशेष म्हणजे एका सत्रात परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या १ कोटींहून अधिक असते. एकट्या निट युजी मध्ये सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी आणि युजिसी नेट मध्ये ११ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. याशिवाय CUET UG परीक्षेत १३ लाखांहून अधिक उमेदवार बसतात.

ज्या उद्देशाने एनटीए स्थापन करण्यात आली. त्या उद्देशापर्यंत ही संस्था पोहोचू शकली नाही.. एनटीए ची स्थापना २०१८ मध्ये झाली होती, परंतु त्याच्या स्थापनेपासून जवळजवळ प्रत्येक वर्षी परीक्षेत अनियमितता आणि हेराफेरीचे आरोप होत आहेत. २०१९ मध्ये जेईई मेन दरम्यान, विद्यार्थ्यांना सर्व्हरमधील बिघाडामुळे समस्यांना सामोरे जावे लागले होते. याशिवाय काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका उशिरा आल्याच्या तक्रारीही केल्या होत्या. नीट अंडरग्रॅज्युएट वैद्यकीय प्रवेश परीक्षा २०२० मध्ये एन टी ए वर गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले. अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. या परीक्षेत अनियमिततेच्या अनेक तक्रारी आल्या होत्या.
आता परत एकदा नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याने निटच्या विश्वस्नियतेला तडा गेला आहे. नीट परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर, यंदा या परीक्षेत ७२० पैकी ७२० मार्च मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तब्बल ६७ आहे, त्यामुळे या निकालावर प्रश्न विचारण्यात येत आहे यंदाच्या परीक्षेत पेपर लिंक झाल्यापासून ते निकालामध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात येतोय. नीट परीक्षेचे फार मोठे रॅकेट असून यात अनेकांचे हात गोवल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर… ही देशातील १५ राज्ये आहेत. गेल्या ५ वर्षात परीक्षेचे पेपर फुटले. म्हणजे परीक्षांमधील पेपरफुटीची महामारी देशभर पसरली आहे. सर्व मोठ्या राज्यातील करोडो विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे.
NEET परीक्षेतील अनियमिततेनंतरचा हा निषेध या संतापालाच वाव दिला आहे.
वारंवार पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत, विद्यार्थी प्रचंड संतापले आहेत. पुन्हा पुन्हा पेपर लीक होणे हे सरकारच्या धोरणाचे अपयश आहे. हुशार व होतकरू विद्यार्थी वर्षभर कष्ट करतात आणि मग पेपर फुटला की हेच विद्यार्थी मागे पडतात. ज्यांच्या हाती पेपर जातो असे विद्यार्थी पुढे येतात. निट संस्था स्थापन झाल्यापासूनच संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचारात लिप्त आहे की काय? असाही प्रश्न आता निर्माण होतो आहे. एनटीएनेच एनईईटीचा पेपर घेतल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. त्यानंतरही असा निष्काळजीपणा दिसून येतो. महिनाभरानंतरही तीच व्यवस्था दिसून येते. त्यामुळे एनटीए किती बेफिकीर आहे हे तुम्ही समजू शकता की त्याच चुका पुन्हा पुन्हा केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत त्यात सुधारणा का होत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परीक्षा आयोजित करण्यात अयशस्वी ठरणाऱ्या एनटीएची समस्या कोण सोडवणार? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. २०२१ मध्ये, जेईई मेन परीक्षेत काही चुकीच्या प्रश्नांमुळे गोंधळ झाला होता. अनेक ठिकाणी शिक्षण माफियांकडून परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही झाला. २०२ मध्येच, राजस्थानमधील भांक्रोटा येथे सॉल्व्हर टोळीने NEET परीक्षेत अनियमितता केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाबाबत देशभरात खळबळ उडाली होती, २०२२ मध्ये विविध केंद्रीय, राज्य, खासगी आणि मानीत विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत अनियमिततेच्या तक्रारी आल्या होत्या. सर्वाधिक तक्रारी राजस्थानमधून आल्या आहेत.
प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल वर्धा ९५६१५९४३०६