जागतिक महिला दिन विशेषांक

साप्ताहिक शिक्षक ध्येय रविवार ८ मार्च २०२६

संपादकीय… 

 चला, समाजाच्या विचारांना नवीन दिशा देऊया!

घरातील सगळ्यांची काळजी घेणारी; परंतु स्वत:कडे दुर्लक्ष करणारी. घरातील प्रत्येकाची आवडनिवड जपणारी, परंतु स्वत:ची आवडनिवड विसरणारी. सगळ्यांना वेळेवर जेवण करण्यासाठी शिस्त लावणारी, परंतु स्वत:च्या जेवण्याच्या वेळा न पाळणारी. सर्वांसाठी ताजे पदार्थ बनविणारी, परंतु स्वत: शिळे अन्न संपविणारी. मुलांचे शिक्षण, नोकरी, घरातील वडीलधाऱ्यांची सेवा करणारी, परंतु स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य न देणारी अशी स्त्री प्रत्येकाच्या घरात नक्कीच असते. मग ती आई, मुलगी, बहीण वा पत्नी कुणीही असू शकते. मग या स्त्रीची आपण नको का काळजी घ्यायला? घरातील कामे करताना तिला भरपूर आरोग्यविषयक समस्या असतात. परंतु जेव्हा या समस्या तिच्या पेलविण्यापलीकडे जातात तेव्हा ती डॉक्‍टरांकडे जाते. जेव्हा ती आजारी पडते तेव्हाच तिचे महत्त्व कुटुंबाला कळते.

स्त्रीच्या हक्कांसाठी आवाज फक्त ८ मार्चलाच उठवला जातो का? नाही, हा लढा दररोज चालायला हवा. जेव्हा समाज खऱ्या अर्थाने स्त्रीला स्वतंत्र विचार करू देईल, तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेईल, तिच्या अस्तित्वाचा सन्मान करेल, तेव्हाच “स्त्री-दिन” साजरा करण्याची खरी वेळ असेल!

महिला दिनाला शुभेच्छा देणं आणि स्त्रियांचं कौतुक करणं पुरेसं नाही. जेव्हा समाज स्त्रीला खरं स्वातंत्र्य, सुरक्षा आणि सन्मान देईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल. स्त्री ही देवी आहे, माता आहे, सखी आहे—पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे! तिच्या अस्तित्वाचा सन्मान, तिच्या विचारांचा आदर आणि तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही संपूर्ण समाजाची आहे. जेव्हा समाज हे वास्तव स्वीकारेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री-दिन साजरा होईल!

 चला, समाजाच्या विचारांना नवीन दिशा देऊया!

महिला दिन विशेषांक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👇

Click here इथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button