राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन
शिक्षक ध्येय, मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा, प्रायोजक – २, प्रायोजक – ३, प्रायोजक – ४, प्रायोजक – ५ पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे. पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे.
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. या त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे.
राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
- प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी)
- माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत)
राज्यातील शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे कार्य करणाऱ्या संस्था या सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य हेतू आहे.
उपक्रम अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत. अधिक माहिती आणि अहवाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://kaushalyavikas.blogspot.com/2025/06/blog-post_23.html
1) उपक्रमाचे शीर्षक
2) उपक्रमाची गरज व महत्त्व
3) उद्दिष्टे
4) नियोजन
5) यशस्वीता /निष्कर्ष
6) समारोप /फायदे
7) परिशिष्टे
8) उपक्रमाची सद्यस्थिती
9) पीडीएफला (स्वत:चे नाव व गट) असे नाव द्यावे.
उदा. सुनील पाटील गट A
10) स्वत: शाळेत राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र सोबत पाठवावे. प्रमाणपत्राच्या नमूनासाठी
या मुद्द्यांचा समावेश असावा.
शब्दमर्यादा 3000 शब्द असून जास्तीत जास्त 10 फोटोचा वापर करावा. अहवाल 10 एम बी पर्यंत (जास्त नको) पीडीएफ स्वरूपात तयार करून फक्त 9623237135 याच व्हाट्सअॅप नंबरवर पाठवायचा आहे. (इतर नंबरवर पाठविल्यास विचारात घेतला जाणार नाही)
शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत एम. एस. वर्ड मध्ये टायपिंग करून नंतर त्याची पीडीएफ ( .pdf) करून पाठवावी. उपक्रम हा शिक्षकांनी यापूर्वी स्वत: राबविलेला असावा व दुसऱ्या ठिकाणी (उदा. पुणे, सोलापूर) स्पर्धेत पाठविलेला नसावा.
उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ आहे.
9623237135 या व्हॉट्सॲप नंबरवर उपक्रम अहवाल पीडीएफ पाठवावी.
खाली चार नमुना उपक्रम अहवाल दिलेले आहेत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
1. CLICK HERE
2. CLICK HERE
3. CLICK HERE
4. CLICK HERE
विजेत्या उपक्रमशील शिक्षकांना ट्रॉफी, प्रिंट प्रमाणपत्र आणि प्रिंट मासिक देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे ५१+ डिजिटल अंक आणि ५१+ बेस्ट नावीन्यपूर्ण उपक्रम अहवाल पीडीएफ व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.
या स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क आहे..
नोंदणी शुल्क 555 रुपये फोन पे किंवा गुगल पे द्वारे
96 23 23 71 35 या नंबरवर पाठवावे.
पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट
उपक्रम अहवाल pdf च्या खाली 9623237135 याच नंबरवर पाठवावा.
स्पर्धेचा निकाल दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी ‘शिक्षक दिनी’ राज्यातील विविध वर्तमानपत्रात आणि साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये राज्यस्तरावर जाहीर करण्यात येईल.
राज्यातील उपक्रमशील शिक्षक व शिक्षिका यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन, मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा, प्रायोजक – २, प्रायोजक – ३, प्रायोजक – ४, प्रायोजक – ५ तसेच शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात येत आहे.
असा असावा उपक्रम अहवाल : अधिक माहिती आणि अहवाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://kaushalyavikas.blogspot.com/2025/06/blog-post_23.html
1) उपक्रम एम. एस. वर्ड मध्ये टायपिंग करुन त्याची pdf करुन पाठवावी.
2) एका शिक्षकांस दोन-तीन उपक्रम पाठविता येतील.
3) शब्द किंवा पाने यांची कुठलीही मर्यादा नाही. पीडीएफ 10 MB च्या आत असावी.
5) अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ असून ती पुढे वाढविण्यात येणार नाही.
6) पूर्वी पुरस्कार मिळाला असला तरी यंदा पुन्हा सहभागी होऊ शकता (वेगळा उपक्रमसह) तसेच संपादकीय मंडळातील शिक्षक, शिक्षिका देखील यात उपक्रम पाठवून सहभागी होऊ शकता.
7) सकारात्मक विचारसरणी ठेऊन यात सर्वांनी सहभाग नोंदवावा कारण ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
8) निकाल नंतर वाद घालू नये.
9) उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास 9623237135 या नंबरवर किंवा संपादकीय मंडळाशी संपर्क करावा.
10) सर्वात महत्त्वाचे: शुल्क जमा केल्याचा स्क्रीनशॉटसह आपले नाव, गट A किंवा B, आपला संपूर्ण पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर इ. तपशील 9623237135 या नंबरला उपक्रम पी डी एफ च्या खाली व्हाटसअॅपवर पाठवावा.
स्क्रीन शॉट न पाठविलेले उपक्रम विचारात घेतले जाणार नाही.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
शिक्षक ध्येयच्या उपसंपादिका, उपसंपादक, प्रतिनिधी यांचे कडेही आपण प्रस्ताव आणि नोंदणी शुल्क जमा करु शकता..
राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार – 2025

स्पॉन्सर, प्रायोजक पाहिजेत…
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आपण ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केलेले आहेत… 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनी निकाल जाहीर करणार आहोत…
या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप / प्रायोजकत्व फी फक्त पाच हजार रुपये असून यात खालील चार फायदे मिळतील….
(१) सर्व विजेत्या प्रमाणपत्र, ट्रॉफी वर स्पॉन्सरचे नाव व लोगो प्रिंट करण्यात येईल..
(२) स्पॉन्सरला देखील एक ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल…
(३) तसेच राज्यातील सर्व दैनिकातील बातमीत देखील ….. यांचे संयुक्त विद्यमाने म्हणून राज्यभर प्रसिध्दी देण्यात येईल..
(४) तसेच त्यांची एक पूर्ण पान रंगीत जाहिरात मोफत प्रसिद्ध केली जाईल. 23 जून 2025 ते 5 सप्टेंबर 2025 या कालावधीत. शिक्षक ध्येय च्या प्रत्येक अंकात मोफत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल..
प्रायोजक मिळाल्यास नक्की काय होते?
ही रक्कम आपण ट्रॉफी, प्रमाणपत्र, कुरिअर खर्चासाठी वापरणार आहोत… प्रायोजक मिळाल्यास स्पर्धकांकडून नोंदणी शुल्क रक्कम कमीत कमी घेऊन जास्तीत जास्त शिक्षकांना पुरस्कार – पारितोषिक देण्याचा आपला प्रयत्न असतो.
स्पॉन्सरशिप कोण कोण
घेऊ शकतात?
शैक्षणिक संस्था, विविध क्लासेस, शैक्षणिक साहित्य तयार करणाऱ्या कंपन्या, camel, नवनीत इत्यादी, NGO, दानशूर व्यक्ती, एखादी कंपनी, कोणतीही शाळा, महाविद्यालय, ITI, बिल्डर्स, एखादी असोसिएशन, NGO, दैनिक वर्तमानपत्र, मासिक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, दुकानदार, मेडिकल, शिक्षक, शिक्षक संघटना इत्यादी स्पॉन्सरशिप घेऊ शकतात…
अधिक माहितीसाठी संपर्क: 9623237135
किंवा आमचे उपसंपादक, उपसंपादिका, प्रतिनिधी यांचेशी आजच संपर्क साधावा…
संपादकीय मंडळ, साप्ताहिक शिक्षक ध्येय, महाराष्ट्र
आपला व्हाटसअॅप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/IcmTeHgRugkAjASYSv3cj9
अधिकृत शिक्षक ध्येय अॅप डाउनलोड करा आणि मागील 20 एप्रिल 2020 पासूनचे सर्व अंक (252+) डाउनलोड न करता वाचा, कधीही, कुठेही..
नोकरीच्या जाहिराती बघा. https://kaushalyavikas.blogspot.com