छंद म्हणजे मनापासून रममान होणारी गोष्ट. मग त्यात नाविन्यता आणि सुजनशीलता वाढवणे हे प्रत्येकाच्या आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे.
माझा आवडता छंद चित्रकला आहे. लहानपणापासूनच मला चित्र काढायला खूप आवडतं. चित्र काढण्यापेक्षा चित्र रंगवायला तर त्यापेक्षा आवडते. जेव्हा मी चित्र काढते तेव्हा मला माझे मन मोकळे झाल्यासारखे वाटते. चित्र काढत असताना मला हायसे वाटते. मला राग आला किंवा वाईट वाटले असेल तर जेव्हा मी माझ्या काढलेल्या चित्रं कडे पाहते तेव्हा मला खूप छान.
“रंगांच्या खेळात विश्वविस्तारले कॅनवास वर स्वप्न साकारले, पेंट- ब्रशच्या स्पर्शाने आकार घेतले, चित्रकलेचे सौंदर्य उभे राहिले”.

एका पांढऱ्या कागदावर रंगांच्या साह्याने स्वतःचे स्वप्न साकारणे हा एक अद्भुत अनुभव आहे. चित्र काढताना मी स्वतःला विसरून जाते. रंगांच्या साह्याने मी कागदावर एक नवीन विश्व निर्माण करते. प्रत्येक रेषा प्रत्येक रंगछटा प्रत्येक सावली ही सारी माझ्या कल्पनेचे प्रतिमा असते. चित्र काढताना मला शांतता आणि समाधान मिळते.
“छायांच्या नात्यात प्रकाश खेळला…..
रंगांचा संगम मनमोहला
रेखा आणि वकारांच्या नृत्यात
चित्राची जादू पसरली”
चित्रकला हा केवळ छंदच नाही तर एक थेरीपी आहे तणाव, चिंता या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी चित्रकला एक उत्तम साधन आहे. चित्र काढताना आपण आपल्या भावना व्यक्त करतो. आपली मनस्थिती नुसार आपले चित्र बदलत. मला आशा आहे की चित्रकला हा छंद माझ्यासोबत जीवनभर राहील. या छंदामुळे मी नेहमीच समाधान आणि आनंद अनुभवात राहील.
कु. नंदिनी सिद्धेश्वर हिंगमिरे, इयत्ता आठवी, सुरेश विद्यालय बार्शी, जिल्हा सोलापूर