राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक, बालदिनी निकाल व बक्षीस

शिक्षक ध्येय आणि आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२३’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.  

‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे.

अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी)

ब गट (इयत्ता सहावी ते दहावी) 

क गट (इयत्ता अकरावी ते पदवी) 

        विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे ‘चित्रकला’ होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

        ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी…. खालील लिंकवर क्लिक करा

इथे क्लिक करा.. CLICK HERE

या संकेतस्थळांना भेट द्यावी. 

गट अ चे विषय आहेत…  (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)

1. पतंग

2. फुलपाखरू

3. फुगा

४. फुलदाणी  

गट ब चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)

1. माझा आवडता पक्षी

2. माझी शाळा

3. निसर्ग चित्र

४. परी

गट क चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)

1. माझा आवडता प्राणी

2. झेंडा वंदन

3. गावची जत्रा

४. माझा आवडता सण  

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना: आपल्या गटासाठी दिलेल्या चार विषयांपैकी फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे. त्यासाठी प्रथम A4 आकाराचा कागद (झेरॉक्स काढतो तो कागद) घ्यावा. A4 कागद उभा किंवा आडवा ठेऊन आपण चित्र काढू शकता. आपल्या गटासाठी दिलेल्या चार विषयांपैकी फक्त एकाच विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतः चित्र त्या कागदावर काढायचे आहे. चित्र काढून पूर्ण झाल्यावर त्या चित्रास सुबक रंग द्यायचा आहे. रंग कोणत्याही प्रकारचे वापरु शकता. उदा. तेलकट खडू, स्केच पेन, जल रंग, अक्रालीक रंग, रंगीत पेन्सिल, तैल रंग इत्यादी जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते रंग वापरून चित्र छानपैकी स्वतः रंगवायचे आहेत. 

चित्रास रंग देऊन झाल्यावर एक तासाने त्या चित्राच्या कागदावर वरील उजव्या कोपऱ्यात (विद्यार्थ्यांनी स्वतःचे संपूर्ण नाव, इयत्ता, गट अ, ब  किंवा क आणि सुरु असलेले दोन मोबाईल नंबर) मराठी किंवा इंग्रजी भाषेत सुवाच्य अक्षरात पेनने लिहावे.

विद्यार्थ्यांनी हे चित्र स्वतः काढायचे आहे, यासाठी बहीण, भाऊ, आई, वडील किंवा मित्र यांची मदत घ्यायची नाही. त्यांचे कडून चित्र काढून घ्यायचे नाही. तशी शंका आल्यास आम्ही व्हिडीओ कॉल करून लाईव्ह आपणास तेच चित्र पुन्हा काढायला सांगू, त्यामुळे कुठलीही चिटिंग करु नये.

चित्र पूर्ण झाल्यानंतर त्या चित्राचा मोबाईलमध्ये एक छानसा फोटो काढायचा आहे. फोटो काढतांना मोबाईल सरळ फक्त चित्रावरच धरावा. कागदाच्या आजूबाजूला जे ठेवले आहेत ते फोटोत दिसायला नको.

तो फोटो आम्हाला आमच्या …

shikshak.dhyey@gmail.com  

या ईमेल आयडी वर पाठवायचा आहे. ईमेल करतांना ईमेल मध्ये ‘Sub: विषय: गट अ, ब किंवा क साठी – चित्रकला स्पर्धासाठी आपले नाव (उदा. किरण पाटील) चे चित्र पाठवीत आहे.’ असे लिहावे.

खाली ई मेलच्या मजकुरात विद्यार्थ्यांनी स्वतःचे संपूर्ण नाव, विद्यार्थ्याचा एक पासपोर्ट फोटो मेलला जोडावा. इयत्ता, गट अ, ब किंवा क, शाळेचे पूर्ण नाव, शाळेचा पत्ता, दोन मोबाईल नंबर (वडील आणि आईचा), व्हाट्सएप नंबर आणि त्याखाली वडिलांचे नाव, घरचा संपूर्ण पत्ता, लँड मार्क, मु. पो. तालुका. जिल्हा, पिनकोड इत्यादी मराठी किंवा इंग्रजी भाषेत लिहावे. यासाठी आपल्या चित्रकला शिक्षक, आई, वडील, मोठा भाऊ किंवा बहीण यांची मदत घ्यावी.

त्या ई मेलला आपला चित्राचा फोटो अटॅच attach करावा, जोडावा व मेल send करावा.

ई मेल करता येणे शक्य नसल्यास वरील सर्व माहिती व फोटो आपण 96 23 23 71 35 या व्हाटसएप नंबरवर पाठवायचा आहे.

रंगविलेले चित्राचा फोटो जमा करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. 

तीनही गटातील उत्कृष्ठ चित्रांना पारितोषिक दिले जाईल. त्यात सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) + शिक्षक ध्येयचे प्रिंट मासिके यांचा समावेश आहे.

 तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे 51+ डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर किंवा ई मेल वर पाठविण्यात येईल.

चित्रकला स्पर्धेचा निकाल मंगळवार दि. 14 नोव्हेंबर 2023 रोजी, बालदिनाच्या दिवशी साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये जाहीर करण्यात येईल. 

विजेत्यांचे चित्र, विजेत्यांचा फोटो, शाळेचे नाव व पत्ता देखील अंकात प्रसिद्ध करण्यात येईल.

साप्ताहिक शिक्षक ध्येयची वार्षिक वर्गणी 500 रुपये असून यात दर सोमवारी एक याप्रमाणे पुढील वर्षभरात 52 अंक दिले जातात. सोबत मागील 160+ अंक देखील वाचण्यासाठी उपलब्ध होतील.

सवलत: स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी वार्षिक वर्गणी 500 रुपये नसून फक्त 200 रुपये राहील.

चित्रकला स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क: 

गट अ साठी 50 रुपये + वार्षिक वर्गणी 200 रुपये असे एकूण 250 रुपये नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे.

गट ब साठी 100 रुपये + वार्षिक वर्गणी 200 रुपये असे एकूण 300 रुपये नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे.

गट क साठी 150 रुपये + वार्षिक वर्गणी 200 रुपये असे एकूण 350 रुपये नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे.

आपणास वार्षिक वर्गणीदार व्हायचे नसल्यास..  

अ गटासाठी 200 रुपये,

ब गटासाठी 250 रुपये व

क गटासाठी 300 रुपये  

नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या सूचना:

1) या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते पदवीत शिकत असलेली मुले व मुली सहभागी होऊ शकतात.

2) नोंदणी शुल्क भरले नाही तर चित्र विचारात घेतले जाणार नाही.

3) पाठविलेले चित्र विद्यार्थी /विद्यार्थिनी यांनी स्वतः काढलेले व रंगविलेले असावे.

संशय आल्यास व्हिडीओ कॉल करून live पुन्हा एकदा चित्र काढावे लागेल, सबब विद्यार्थ्यांनी स्वतः चित्र काढणे अपेक्षित आहे.

4) नोंदणी शुल्क रक्कम फोन पे, गुगल पे द्वारे 96 23 23 71 35 यावर पाठवावे. व त्याचा स्क्रिन शॉट पण 9623237135 या व्हाट्सएप नंबरवरच पाठवावा.

5) स्पर्धेसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल.

6) त्यांनी जाहीर केलेला निकाल अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल.

7) निकाल जाहीर झाल्यानंतर वाद घालायची, भांडण करण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी या स्पर्धेत भाग घेऊ नये.

8) नाशिक न्यायालय कक्षे अंतर्गत.

9) स्पर्धेचा निकाल, विजेत्यांचे फोटो, नाव व चित्रे न्यूज पेपर, इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारे प्रसिद्ध केले जाईल.

10) राज्यस्तरीय साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये देखील विद्यार्थ्यांचे चित्र, फोटो, नाव, शाळेचे नाव व विद्यार्थ्यांची मुलाखत प्रसिद्ध केली जाईल.

11) दिनांक 31 ऑक्टोबर नंतर पाठविलेली चित्रे स्पर्धेसाठी विचारात घेतली जाणार नाही.

12) नोंदणी शुल्क न भरलेली चित्रे विचारात घेतली जाणार नाही.

राज्यातील चित्रकला शिक्षक यांनी प्रार्थनेच्या वेळी किंवा वर्गात सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी सविस्तर माहिती द्यावी आणि सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जि. वर्धा आणि ‘शिक्षक ध्येय’च्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात आले आहे. उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास.. पुढे वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ..

इथे क्लिक करा.. CLICK HERE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button