साप्ताहिक शिक्षक ध्येय वर्ष 7 वे अंक 4 था सोमवार दिनांक 18 मे 2026 

संपादकीय… 

आमची काय चूक? आमच्या भविष्याशी नका खेळू..

आम्ही खूप अभ्यास केलेला आहे. इयत्ता नववी पासूनच आम्ही तयारी करत आहोत. आम्हाला पुढे जाऊन भविष्यात डॉक्टर बनायचे आहे. याअगोदर देखील असे बरेच स्कॅम झालेले आहे. हे कुठेतरी थांबवा आता. 

आम्ही खूप अभ्यास केला होता, खूप आत्मविश्वासाने ३ मे रोजी परीक्षा दिलेली होती. आता पुन्हा २१ जूनला परीक्षा देण्यासाठी तेवढा आत्मविश्वास नाही राहिला आता. आम्हाला पुन्हा शून्यातून प्रवास करावा लागणार आहे, सर्व मेहनत पाण्यात गेली आमची. कृपया आम्हाला शिकू द्या, डॉक्टर व्हायचंय आम्हाला. त्यासाठी आम्ही चार वर्षापासून जीवाचे रान केले, रात्रीचा दिवस केला, १८ ते २० तास अभ्यास केला आहे. आमच्या जीवाशी नका खेळू. कृपया आम्हाला शिकू द्या, आम्हाला जगू द्या. यात नका राजकारण करु, नका बिझनेस करु.

आमच्या आई वडिलांचे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे. ते पण प्रामाणिकपणे अभ्यास, कष्ट, मेहनत करुन. आम्हालाच माहिती आम्ही कसे जगतो ते. 

पोटाला चिमटा मारून क्लासची फी भरणारे आमचे वडील आणि रात्री प्रोत्साहन आणि चहा करून देणारी रात्रभर जागणारी आमची आई. यांच्या डोळ्यातील स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे. यांना डॉक्टर होऊन दाखवायचे आहे. आमचे डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे आम्हाला. त्यासाठी आम्ही जीवाचे रान केले आहे. आम्हाला सुखाने जगण्यासाठी शिकू द्या. परीक्षा देण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करा. तुमच्या व्यवस्थेच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची? 

आमच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे. आता पुन्हा पुस्तक उघडा, नोट्स काढा, नोट्स वाचा. पुन्हा रात्रभर अभ्यास करा. २१ जूनला पुन्हा परीक्षा द्या. 

२१ जूनला तरी नियमानुसार परीक्षा सुरळीत होईल का? प्रामाणिकपणे पेपर चेक होतील का? कोणताही गोंधळ न घडता निकाल लागेल का? याची शाश्वती कोण देणार आम्हाला?

संपूर्ण साप्ताहिक शिक्षक ध्येय अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

CLICK HERE 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button