मास्तरले धमकावून धमाकेदार ऐंट्री करण्यास गावातले बडे नेते सरसावले होते.
“नाही, नाही या गुरुजीले आता चांगली अद्दल घडवावीच लागेल. आमी शाळेत होतो, तवापासुन पायतो, हे सर पोरायले शिस्तीच्या नावाखाली लय मारतात.”
राऊत सर एक कर्तव्यदक्ष अन हाडाचा शिक्षक. हाडाचा यासाठी म्हटल की, बहुधा त्यांच्या रक्तातच हिमोग्लाबीन च्या जोडीला कर्तव्यपरायनता वाहत असावी. प्रत्येक कामाला हात लावल्यावर आपल्या नावाला साजेस काम घडावं हा त्यांचा अट्टहास. अनेक पिढ्या घडविण्याचे भाग्य त्यांना या शिक्षकी पेशानं दिलं, हा त्यांचा विश्वास.
काल घडल त्यानं त्यांच्या आयुष्याला कलाटनीच दिली.
दिर्घ श्वास घेत राऊत सर स्वत: कुठ कमी पडलो याचा मागोवा घेत होते. चुका स्वत:त शोधण्याचा गुण भगवंत फार कमी माणसांना देतो म्हणा, दुसऱ्यात चुका शोधणाऱ्या माणसांत उठून दिसण्यासाठी.
काल सरांनी त्यांच्या सातवीच्या वर्गातल्या एका मुलाला बेशिस्त वर्तन करण्याच्या कारणावरुन गालावर चापट मारली होती. अन एका मुलीला ही होम वर्क वेळेत पुर्ण न केल्याच कारण देत छडी दिली होती. (सरांच्या नजरेला अर्ची अन परशाची झलक त्यांच्या दोघांत दिसली होती. अन गरिबाची पोरं या वयात वाईट मार्गाला लागू नये हा त्यांचा उद्देश.. शिक्षा करण्याच मुळ कारण ही तेच.)
अनेक गरिबांच्या मुलांना सढळ हातांनी मदत करत पेन, पेन्सिली, वह्या, पुस्तके, परिक्षा फि आदी कार्यांत स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करत गेले २३ वर्षे त्यांनी हे व्रत अखंड चालू ठेवले होते. विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक ही पदवी त्यांची जमेची बाजू.
आजच्या प्रकाराने मुलगा तावा तावाने घरी जावून सरांनी त्याच्यावर मारुन किती अन्याय केलाय हे पालकांना समजावुन सांगत होता, अन दुपारच्या सुट्टीत घरी गेलेली प्रेरणा आईला मी वर्गात शांत असतांनाही सरांनी माझ्यावर कसा अन्याय केला, अन होमवर्क तर बऱ्याच जणींच अपूर्ण होतं पण सरांनी मलाच मारल, हे पटवून सांगत होती..
ते यशस्वी ही झाले होते. कारण दुसऱ्या दिवशी परिपाठ चालू असतांना, पसायदान मुलं डोळे मिटवून म्हणत होती. जे खळांची व्यंकटी जावो।….मध्येच मुलांना थांबवत, बंद करा हे सर्व अस म्हणत, गावातल्या माणसांचा घोळका आवारात शिरला.
काय हो राऊत गुरुजी, कोणाच्या भरवशावर शिकवता तुमी. आमचे पोरं काय अनाथ वाटले काय तुमाले. त्यायले कितीबी मारसान अन आम्ही काहीच म्हणार नाही. मी म्हणतो माया पोराचा काय गुन्हा हाय. माय पोऱगं कुणाच्या वाटी जात नाही. तुम्ही किती मारल काल. घरी पोराले, श्यामले पुराण्यान मारणारा त्याचा बाप तावातावात बोलत होता. त्याच्या एकुलत्या एका पोरावर सरांनी चापट मारुन खुप अन्याय केला होता.
अन माया पोरीलेबी कावुन मारल तुमी. ती बिचारी पहीली पासुन रोज घरचा अभ्यास पुर्ण करत असते. आज एक दिवस नाही केला म्हणजे काय येवडा मोठा गुना केला काय तीनं. मी कदि पाच बोटं लावले नाहीत माया पोरीले अजून. आज तुमी चक्क तिले छड्या मारुन राहिले. प्रेरणाचा बाप संतापान बोलत होता.
कायद्यानं पोरायले मारण गुन्हा आहे हे तुम्हाले माहित नाही काय? गावातल्या पारावर चोविस तास बसून नायंटीच्या बदल्यात कायदा शिकवणारा गावातला कायद्याचा जाणकार तावानं बोलत होता.
बघता बघता गावातली गर्दी वाढत होती. कारण ज्यांना गुरुजींनी मारलं होतं, त्यांच्या बापांच गावात राजकीय वजन चांगल होतं. अन आज गावातल्या ग्रामपंचायत निवडुकीच, प्रचाराच नारळ फुटणार होतं.
दोंघांच्या बापाले यंदा एकाच पँनल मंदी उभं करायच होत, उमेदवार म्हणुण. मास्तरले धमकावून धमाकेदार ऐंट्री करण्यास गावातले बडे नेते सरसावले होते.
नाही, नाही या गुरुजीले आता चांगली अद्दल घडवावीच लागेल. आमी शाळेत होतो, तहापासुन पायतो, हे सर पोरायले शिस्तीच्या नावाखाली लय मारतात. पोरीले डोळा मारण्याच्या कारणावरुन सातवीत असतांना राऊत सरच्या हाताची चव चाखणारा त्यावेळचा विद्यार्थी, गण्या अन्यायाचे ढोल पिटत होता.
परिपाठाला जमलेले पोरं कनवाळू नजरेने सरांकडे पाहत होते.. शाळेत शिकणाऱ्या पोरांसमोर शाळेची शाळा करण्याच कारस्थान चालू होते.
राऊत सर ही कोणताच पुरावा नसल्याने, दोघांच्याही पालकांना, मुलाला अन मुलीला मारण्याच, अन वठनिवर आणण्याच खर कारण स्पष्टपणे सांगू शकत नव्हते. खर तर गुरुजींनी सलग आठ दिवसांपासून त्यांच्या नजरेन दोघांचे चाळे पाहिले होते. प्रेरणाला श्यामच्या अन श्यामला प्रेरणाच्या अंगावर कागद चुरगळून त्याचा गोळा एकमेकांच्या अंगावर फेकतांना.
पण हे खर कारण कस सांगणार.
शाळेचा अख्य़ा स्टाफनं पालकांना शिस्तीचे महत्व सांगत होता.
मात्र जे घडू नये तेच झाल. राऊत गुरुजींच्या तेविस वर्षाच्या शिक्षण सेवेतल्या शिस्तप्रिंय, कर्तव्यदक्ष अन विद्यार्थी केंदित अध्यापन व्रताला वळन देणार सत्य.
गावातल्या राजकारणात नुकत्याच दाखल झालेल्या अठरा वर्षाच्या प्रचारात सक्रिय सहभागी कार्यकर्त्यांचा हात बाचाबाचित सरांच्या काँलर पर्यंत गेला.
काँलर हिसकावत ..x.x..x. ,म्हणत नायंटी रिचवुन आलेला कार्यकर्ता बरळला. अखी हायात गुरुजींच्या चमकत्या अन पाणावल्या डोळ्यांनी क्षणात पाहिली. अगदी सेवेत रुजु झाल्यापासून आता पर्यंत.
जमावातले समजदार लोकं गुरुजींच्या शिस्तप्रिय अन विद्यार्थ्यांप्रती आस्था असणाऱ्या राऊत सरांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. पण राजकारणाच्या चक्कीत पिसणार्या अक्षुत धान्याची जागा राऊत सरांनी घेतली होती….
राऊत गुरुजी शिक्षा करण्याच खर कारणही सांगू शकत नव्हते…
पुन्हा पोरांच्या वाट्याला जावू नका, असा जबर दम देत कार्यकर्ते निघूण गेले.
दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली.
“शिस्तीच्या नावाखाली शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण“
डबडबल्या डोळ्यांनी गुरुजी मथळा वाचत होते… त्यांच मन सांगत होतं… भविष्यात प्रत्येक गल्लीत सैराट झालं तर नवल वाटून घेवू नका.. कारण शिक्षकांस कायद्याचा धाक दाखवत गल्ली बोळात सैराट निर्माण होण्यास तुम्हीच उत्तेजीत करत आहात.. हेच पोरं जर तुमच्याशी बेशिस्तीनं वागले ना तर समजाल, शिस्त शिकवणाऱ्या हातांना तुम्हीच छाटल होते ….
मनाला समजावत राऊत गुरुजी आठवत होते ज्ञानोबा रायांच्या पसायदानाच्या ओळी, जे खळांची व्यंकटी जावो… कानाला खळाच लावला होता सरांनी अन त्यांच्या सहकार्यांनी…
संतोष मनसुटे, रोहणा ता. खामगांव, जि. बुलडाणा, 9099464668