अभिप्रायाची अपेक्षा
का ठेवावी इतरांकडून
लिहीत राहावे सातत्याने
नवं कल्पनांना फुलवून..
समुहात सगळेच सदस्य
कधीच सक्रिय नसतात
म्हणूनच तर लिखाणावर
अभिप्राय कमी मिळतात..
काही समूह सदस्य फक्त
संदेश करतात क्लिअर
त्यामुळे त्यांच्याकडून
नसे अभिप्रायाचा स्वर..
काही असतात सक्रिय
अन् लिखाणही वाचतात
पण ते अभिप्राय न देता
जळाऊवृत्ती दाखवतात..
काहीजण करतात अपेक्षा
तुमच्याही अभिप्रायाची
त्याशिवाय ते नाही करत
स्तुती तुमच्या लेखनाची..
बरीच कारणे असतात
अभिप्राय न मिळण्याची
त्यामुळे नाराज न होता
शब्दसुमने फुलवायची..
सचिन रामचंद्र मस्कर, नवी मुंबई, ८४२२०२०९६९