शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.
‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत.
महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर
सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार
असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.
1) उपक्रमाचे शीर्षक
2) सामाजिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती अथवा
3) शैक्षणिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती
4) उपक्रमाची गरज व महत्त्व स्पष्ट करावे.
3) नियोजन कसे केले?
4) प्रत्यक्ष कार्यवाही कशी केली?
5) उपक्रमाचा निष्कर्ष काय?
6) उपक्रमाचे फायदे कोणते आणि कोणाला-किती जणांना झाले?
7) परिशिष्टे
8) उपक्रमाची सद्यस्थिती
9) यु-टूब व्हिडीओ लिंक असल्यास
10) उपक्रम स्वतः राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र
11) मिळालेले विविध शिफारसपत्रे आणि पुरस्कारांची नावे
12) पीडीएफला स्वत:चे नाव द्यावे.
13) आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, पिनकोड आणि मोबाईल आणि व्हाट्सऍप नंबर प्रस्तावात शेवटी लिहावा.
या मुद्द्यांचा समावेश असावा.
शब्दमर्यादा ३००० शब्द असून जास्तीत जास्त निवडक १० फोटोचा वापर करावा. अहवाल १० एम बी पर्यंत पीडीएफ स्वरूपात तयार करून पाठवायचा आहे.
महिलांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल/प्रस्ताव बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत MS Word मध्ये टाईप करुन नंतर त्याची pdf तयार करून पाठवावी.
६ नमुना प्रस्ताव अहवाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे…
१ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here
२ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here
३ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here
४ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here
५ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here
६ नमुना प्रस्ताव अहवाल Click Here
सदर उपक्रम हा यापूर्वी स्वत: राबविलेला असावा.
उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२५ आहे.
विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी), सन्मानपत्र (प्रिंट प्रमाणपत्र) देण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र व्हाटसअॅपवर पाठविण्यात येईल.
या स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क आहे
एका प्रस्तावासाठी रु. 500 (पाचशे रुपये) नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे.
आपला अहवाल प्रस्ताव पीडीएफ सादर करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२५ आहे. त्यानंतर पाठविलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही.
प्रस्तावाची पीडीएफ 9623237135 या व्हाटसअॅप नंबरवर पाठवावी.
नोंदणी शुल्क भरण्यासाठी फोन पे/G पे नंबर 9623237135 हा आहे.
9623237135 याच मोबाईल नंबरवर शुल्क भरल्याचा स्क्रीन शॉट पाठवावा.
किंवा शिक्षक ध्येयच्या उपसंपादिका, उपसंपादक, प्रतिनिधी यांचे कडेही आपण प्रस्ताव आणि नोंदणी शुल्क जमा करु शकता… संपर्क : मधुकर घायदार 9623237135
दि. ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिनी’ साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये निकाल जाहीर करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
महत्त्वाच्या सूचना:
१) या स्पर्धेसाठी कोणत्याही क्षेत्रातील महिला सहभागी होण्यास पात्र आहे.
२) या स्पर्धेसाठी सामाजिक कार्यकर्ती महिला, डॉक्टर, वकील, शिक्षिका, राजकारणातील महिला, गृहिणी, सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरी करणारी महिला सहभागी होऊ शकतात.
३) स्पर्धेसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल.
४) त्यांनी जाहीर केलेला निकाल अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल.
५) निकाल जाहीर झाल्यानंतर वाद घालायची, भांडण करण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी या स्पर्धेत भाग घेऊ नये.
६) नाशिक न्यायालय कक्षे अंतर्गत.
७) स्पर्धेचा निकाल, विजेत्यांचे फोटो, नाव न्यूज पेपर, इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारे राज्यभरात प्रसिद्ध केले जाईल.
८) राज्यस्तरीय साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये देखील विजेत्यांचे फोटो, नाव, व मुलाखत प्रसिद्ध केली जाईल.
९) दिनांक २० फेब्रुवारी नंतर प्राप्त अहवाल प्रस्ताव स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार नाही.
१०) नोंदणी शुल्क न भरलेले अहवाल विचारात घेतले जाणार नाही.
११) पुढील अटी व सूचना वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा …