शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषय कुठलाही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबवली जाऊ शकत नाही. त्याचे सफल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण, करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्यापनात त्याचा वापर करावा.
शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान असते. यात शिक्षकाचा भय, चिंता, यांच्या गाठी शिक्षकाच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विद्यार्थ्यांचा कल, त्याची आवड व त्याच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वतःच्या आयुष्यात नैतिक मूल्याची आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकाची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजू शकतो.
जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींना अपार प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाही तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने (मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते.
स्वत: शिकण्याची तयारी
शिक्षकाने स्वत: शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतरांना शिकवणा-याने सतत शिकत राहायला हवे. त्याची शिकण्याची प्रक्रिया कधीही बंद पडू नये शिक्षकांनी आयुष्याच्या अंतापर्यंत विदयार्थी म्हणूनच जगायला हवे. त्यांनी शिकण्याची इच्छा कधीही मरू देता कामा नये. शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत नाही म्हणून शिक्षणाशी संबंधित सर्व विषयावर त्याचे सखोल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्यापनात त्याचा वापर करावा.
महाराष्ट्र शासनाने बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क २००९ ला केला आणि त्याची अंमलबजावणी एप्रिल २०१० पासून सुरू झाली. त्यात शिक्षकांची कर्तव्ये सांगितली आहेत.
शाळेत नियमितपणे वक्तशीरपणे हजर राहणे.कायदयातील तरतुदीनुसार अभ्यासक्रम संचालित करणे, व तो पूर्ण करणे.निर्धारीत कालावधीत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे.प्रत्येक बालकाच्या अध्ययन क्षमतेचे मूल्यमापन करणे.कोणतीही आवश्यकता भासल्यास अतिरित पूरक शिक्षण देणे. माता-पिता आणि पालकाबरोबर नियमित सभा घेणे.अध्ययनातील प्रगती याबाबतची माहिती पालकांना अवगत करणे. विहित करण्यात येतील अशी सर्व कर्तव्ये पार पाडणे. आनंददायी, नावीन्यपूर्ण, पद्धतीचा अध्यापनात वापर व तणावमुक्त अध्ययन प्रक्रियेचा अवलंब करणे. शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व विशेष प्रशिक्षण पुरविणे. अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक, मूल्यमापन प्रक्रिया विकसन, प्रशिक्षण रचना व प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणे.
बालकांचे संकलित नोंदपत्रक, अंतर्भूत असणारी माहिती अदययावत ठेवणे.
शिक्षकांच्या कर्तव्यामुळे शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी आलेली आहे शिक्षकांनी ती टाळून चालणार नाही. शिक्षकांनी राबविण्याचे उपक्रम: शिक्षकांनी खालील उपक्रम राबवावेत.

शिक्षकाने ग्रंथालयात संस्कार करणा-या पुस्तकांच्या समावेश करावा. शाळेच्या प्रशासकीय वेळेव्यतिरित इतर वेळात संस्कार वर्गाचे आयोजन करावे.पालकांशी विदयार्थ्यांच्या प्रगतीबाबत चर्चा करणे.शाळेतील बालसभांमधून (जयंती, पुण्यतिथी, इतर विशेष दिन मार्गदर्शनाचे जाणीवपूर्वक नियोजन करणे. अध्यापन ही एक साधना मानणे. तणावमुक्त अध्यापन करून सुसंस्कारित भावी पिढी निर्माण करणे. व्यापक सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यमापन करून मुलांचे प्रगतीपत्रक तयार करणे. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे. शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे.
शासनाने निर्धारीत केलेली किमान शैक्षणिक अर्हता प्राप्त करणे. सकाळ-दुपार विदयार्थ्यांची हजेरी घेणे. गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे. कृतिशील अध्ययन, ज्ञान रचनावाद, बालस्नेही, स्वयं अध्ययन इत्यादी द्वारा ज्ञानदानाचे कार्य करणे. कार्यक्रमाचे सादरीकरण, सूत्र संचालन कसे करावे या विषयी मार्गदर्शन करणे. शैक्षणिक सहलीचे आयोजन करून ऐतिहासिक वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे मूल्य रुजविणे.मुलांचे नियमित स्वाध्याय तपासणे व झालेल्या चुका त्यांचे निदर्शनास आणून देणे. विविध स्पर्धांचे आयोजन करणे. उदा. हस्ताक्षर इत्यादी.विशेष गुणवत्ताप्राप्त विदयार्थ्यांना बक्षिसे देणे. शिक्षकाने मनापासून अध्यापन करावे.
शिक्षकांनी प्रामुख्याने विद्यार्थ्यांविषयी पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक !
विद्यार्थी पाठ्यपुस्तकांतच घोटाळणार नाहीत, इकडे लक्ष द्या.त्यांना ग्रंथालयात जाणे आणि अधिकाधिक ज्ञानकण ग्रहण करणे, यांसाठी प्रेरित करा.त्यांना अधिक आणि नेमके ज्ञान मिळेल, इकडे लक्ष द्या.विद्यार्थ्यांनी ग्रंथ वाचल्यावर त्यांना त्यावर विचार करायला शिकवा.आपले शिक्षक आणि अन्य विद्यार्थी यांच्यासह चर्चा करायला त्यांना प्रेरित करा.शिक्षक हा केवळ शिकवत नसतो, तर विद्यार्थ्यांत स्वतंत्रपणे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता निर्माण करत असतो.
क्लासरूम मॅनेजमेंट हे एक लिंचपिन आहे जे अध्यापन शिकण्याच्या प्रक्रियेत शिकवणे आणि शिकणे साध्य करता येते. नियोजन, कार्यपद्धती आणि संसाधने आयोजित करणे, कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी वातावरणाची व्यवस्था करणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे,संभाव्य समस्यांचा अंदाज घेणे यामध्ये मुख्य भूमिका शिक्षकच बजावतात. आज प्रचलित शिक्षणामध्ये विद्यार्थी व शिक्षणाप्रती शिक्षकाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाचा आहे.
श्री सुरेश बन्सी उतपुरे, बुलढाणा, मो. नंबर 9657579785