भारतीय तरुण पिढीला कौशल्य प्रशिक्षण मिळावे या साठी भारत सरकारने व्यवसाय शिक्षण योजना 2015, Vocational Education Scheme (VES) ही योजना सुरू केली आहे.

ही योजना डिसेंबर २०१५ मध्ये सुरु करण्यात आली आहे. तरुणांना विविध कामांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. कौशल्य विकास व उद्योग मंत्रालय राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (NSDC) सेक्टर स्किल कौन्सिल (SSC) National Skill Qualification Framework (NSQF) यांच्या माध्यमातून या योजनेची आंमलबजावणी करण्यात येते.
या योजनेचे मुख्य कार्य म्हणजे तरुणांसाठी संधी निर्माण करणे, जेणेकरून या संधींमध्ये ते रोजगारासाठी उपयुक्त कौशल्य प्राप्त करून आपले जीवन सुधारतील तसेच दुसऱ्यांच्या आयुष्यात देखील हे तरुण आमुलाग्र बदल घडवून आणू शकतील.

सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील ८०० + शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण दिले जात आहे. यात प्रामुख्याने ब्युटी आणि वेलनेस, ऑटोमोबाईल सर्विस टेक्निशियन, रिटेल, हेल्थकेअर, मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, स्पोर्ट्स, मिडिया आणि एटरटेंटमेंट, ट्रॅव्हल्स आणि टुरिझम, अॅग्रीकल्चर, बँकिंग आणि फायनान्स हे दहा अभ्यासक्रम शिकविले जातात. यात 70 गुणांचे प्रात्यक्षिक व 30 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.