राज्यातील 44 विद्यार्थ्यांना बालदिनी ‘बालचित्रकार पुरस्कार’ जाहीर

शिक्षक ध्येय आणि आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२३’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. स्पर्धा आयोजनाचे हे दुसरे वर्ष होते.

राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.  

अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी)

ब गट (इयत्ता सहावी ते दहावी) 

क गट (इयत्ता अकरावी ते पदवी) 

विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे ‘चित्रकला’ होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

अ, ब आणि क गटातील एकूण 44 उत्कृष्ठ बाल चित्रकारांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) + शिक्षक ध्येयचे प्रिंट मासिके यांचा समावेश आहे.

तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे  डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.

विजेत्यांमध्ये अ गटात प्रतिक प्रदीप देसाई, सिंधुदुर्ग

झुणाइराह वासिम शेख, पुणे

रुद्राक्ष मल्लिकार्जुन कलशेट्टी, उस्मानाबाद

किंजल चेतन पाटील, नंदुरबार

आराध्य योगेश नाचणकर, रत्नागिरी       

तितिक्षा रवि परमार, मुंबई

तनुल रवि परमार, मुंबई

श्रेया सतीश चव्हाण, लातूर

प्रसाद प्रमोद ठोंबरे, मुंबई

माही नवनीत मसुरकर, सिंधुदुर्ग

वेदांत राहुल दहिफळे, जालना  

नीरजा मनोज वेदक, रत्नागिरी   

सार्थक मकरंद चव्हाण, मुंबई

मानसी मनोज देवळेकर, कल्याण

आरूष योगेश खाके, रत्नागिरी      

शंभवी नितीनसिंग राजपूत, छत्रपती संभाजीनगर      

शिरीष गजानन काळबांडे, यवतमाळ

ऋग्वेद विवेक घाडी, मुंबई        

सर्वज्ञ ज्ञानेश्वर चव्हाण, पुणे        

श्रेया संजय चौधरी, वर्धा        

तेजस मंगेश रणखांब, लातूर        

युवराज दामोधर डाखोरे, सोलापूर         

ब गटात    

प्रिया प्रदीप देसाई, सिंधुदुर्ग  

व्यंकटेश सैदू चव्हाण, ठाणे      

समृद्धी श्रावण सोनवणे, नाशिक       

मंथन योगेश राऊत, मुंबई                    

वेदिका गजानन भोपळे, बुलढाणा         

प्रथमेश संजय गोपाळे, मुंबई          

तनिष्का इंद्रजीत हडपसरकर, पुणे           

जय गजानन काळबांडे, यवतमाळ           

मारिया जलालूद्दिन अन्सारी, पुणे            

शशांक समीर मिंडे, रायगड             

नाझीया बद्रेअलाम अंसारी, पुणे           

ऋतुराज प्रशांतराव गांधे, यवतमाळ             

वैशाखी भारत प्रधान, छत्रपती संभाजीनगर            

वेदान्त वैभव वाघ, जळगांव            

दिव्या शिवाजी कांबळे, ठाणे           

गौरंगी तुकाराम चव्हाण, पुणे             

कार्तिक परशुराम मस्के, मुंबई             

गायत्री तुकाराम चव्हाण, परभणी              

स्नेहल विलास जवळ, मुंबई

क गटात              

राणी दयानंद वाव्हळे, छत्रपती संभाजीनगर            

ऋतिका भास्कर राऊळ, सिंधुदुर्ग     

आरती नागनाथ सोळंके, बीड यांचा समावेश आहे.

या स्पर्धेसाठी श्री. देविदास शिवराम हिरे, कला शिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड, जि. नाशिक आणि श्री. अमित सुभाष भोरकडे, जि. प. शाळा, सोड्डी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार, नाशिक; कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे वर्धा; मिलिंद दीक्षित, वर्धा; वसुधा नाईक, पुणे; भाग्यश्री पवार, जळगांव; संगीता पवार, मुंबई; संजय पवार, रायगड; भागवत मांदळे, नाशिक; मृगया मोरे, रत्नागिरी; किरण काळे, पुणे; सी. एच. बिसेन, गोंदिया;  उल्केशकुमार वाळुंजे, छत्रपती संभाजीनगर; स्नेहा गाढे, रायगड; संगीता म्हस्के पुणे; प्रमिला गावडे अहमदनगर; पांडुरंग दळवी, सिंधुदुर्ग; प्रेमजीत गतीगंते, मुंबई; महादेव खळूले, लातूर; डी. जी. पाटील, नंदुरबार; कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर; … संपूर्ण संपादक मंडळाने अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button