तुषार हा एक हुशार आणि होतकरू विद्यार्थी होता. त्याचे वडील वडापाव विकत असत पण त्या दिवशी काहीतरी भलतच घडल. तुषारच्या आईवडिलांचा अपघात झाला, यामुळे ते दोघेही बीछान्याला खीळले. त्यांचेकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते त्यामुळे त्यांना उपचार घेता आले नाहीत.
तुषार वडापाव विकण्यासाठी वडापावच्या गाडीवर जाऊ लागला. त्याला पुरेसे पैसे मिळत नव्हते. या सर्व कामामुळे तुषारच शाळेत जाणं बंद झाले, त्यामुळे गोखले सरांना त्याची काळजी वाटू लागली.
एकदा गोखले सर त्याचा पत्ता शोधत त्याच्या घरी आले. ‘काय रे तुषार, तु शाळेत का येत नाहीस?’ गोखले सर म्हणाले. तुषारचे डोळे पाणावले. गोखले सरांना सर्व परीस्थिती समजली. त्यांनी तुषारला आधार दिला. गोखले सरांनी तुषारच्या आईवडिलांना दवाखान्यात दाखल केले. तुषारला आपल्या घरी नेले. तुषारच्या शाळेची थकलेली फी सुद्धा भरली.
आता तुषारच्या परीक्षेचा निकाल जवळ आला होता. तुषारने परीक्षेत खूप मेहनत घेतली होती आणि अखेर तो दिवस उजडला. तो दिवस होता 5 सप्टेंबर 2010 शिक्षक दिन.
त्या दिवशी तुषारचा निकाल लागला तो साऱ्या शाळेत पहिला आला होता. दहावीत त्याला 91 टक्के गुण पडले. सर्वांनी त्याचे खूप कौतुक केले. तुषार आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाला, ‘आज मी पास झालोय ते फक्त गोखले सरांमुळेच. सहा महिन्यापूर्वी माझ्या आईवडिलांचा अपघात झाला होता, तेव्हा गोखले सरांनी मला खूप आधार दिला. मला त्यांच्या घरी नेले, माझी शाळेची थकलेली फी सुध्दा त्यांनी भरली. माझ्या आईवडीलाच्या उपचारासाठी पैसे सुद्धा त्यांनीच दिले. आपले गोखले सर खरेच ‘आदर्श शिक्षक’ आहेत. एवढे बोलून तो गोखले सरांच्या पाया पडला. गोखले सरांना त्याने खरा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार दिला. त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या शाळेत ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. त्याच दिवशी सर्वांना शिक्षणाचे, शिक्षकांचे आणि शिक्षक दिनाचे महत्त्व पटले.
कु. श्रावणी संदीप गुंड
आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे