डिजिटल रक्षाबंधन… 

संपादकीय…

डिजिटल रक्षाबंधन… 

काळ बदलला तसा प्रत्येक सण साजऱ्या करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. पूर्वी बहिणीचे लग्न झाल्यावर बहीण दुसऱ्या गावी राहायला गेली की फक्त सणासुदीलाच माहेरी येत असे. राखी पौर्णिमा आली की भाऊ-बहीण दोघांचेही ऊर आनंदाने भरून यायचे कारण होते बहिणीला मिळणारी राखी पौर्णिमाची खास भेट. पूर्वीपेक्षा आता याचे महत्त्व दिवसें दिवस कमी कमी होताना जाणवते. आज हा सण साजरा करतांना बहीण भावाची प्रत्यक्ष भेट होत नाही. भाऊ आणि बहीण यामध्येच हा मोबाईल आला अन् रक्षाबंधन सण साजरा करण्याचा आनंद या मोबाईलने हिरावला.

सद्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी केली जाते. सद्या बहीण भावांकडे न जाताच हा सण साजरा होतो. पोस्टाने, कुरिअरने किंवा डिजिटल सोशल मीडियाद्वारे बहीण आपल्या भावाला राखी पाठवते. फोन पे, गुगल पे द्वारे रोख रक्कम किंवा ऑनलाईन खरेदी केलेले एखादे गिफ्ट भाऊ आपल्या बहिणीला भेट म्हणून पाठविले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात भेट वस्तूंचे अनेक पर्याय आज आपल्या समोर उपलब्ध आहेत.

            आजकाल माणुसकी कमी कमी होत चालली आहे. नात्यातील वीण घट्ट होण्याऐवजी सैल होत चालली आहे. आत्ताच्या मुलांना प्रत्येक सणासाठी किंवा उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीत “मामाच्या गावाला जाऊ या” स्वप्नवत वाटते. ना भेटणे, ना बोलणे, ना सुख:दुःखाच्या गप्पा.

आपल्या संसारात व्यस्त असणारी बहीण आणि भाऊ या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पहात असतात अन् नायलाजाने आधुनिक पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी करण्यात ती धन्यता मानतात कारण भावाकडे, बहिणीकडे सद्या असे सण साजरे करण्यासाठी वेळच नाही… पूर्वीचे ते प्रेम, आदर, भेटीची तळमळ, वाट पाहण्याची मज्जा, सण साजरा करण्याचा आनंद, भेट वस्तूवरून रुसवा, फुगवा, प्रेमाचे भांडण ही सर्व मजा, आनंद आज आपण  हरवून  बसलो  आहे. काही घरी आजही राखी पौर्णिमा पूर्वी सारखीच धूम धडाक्यात साजरी करताना बघावयास मिळते. मग काय.. आपल्या घरी यंदा राखी पौर्णिमा कशी साजरी करणार?

साप्ताहिक शिक्षक ध्येय अंक वाचण्यासाठी … येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button