पावसापूर्वी माणसाची खूप वाईट परिस्थिती असते. लोकांना पाणी पिण्यासाठी भेटत नाही. सगळ्या विहिरी, बंधारे, नद्या व गावातील तळी हे सर्व कोरडे पडलेले असते. पावसापूर्वी कडक उन्हाळा असतो त्या वेळेला लोकांना खूप गरम होत असते अंगाची लाही लाही होत असते. अशा वेळेला माणसांना पाण्याची खूप गरज पडते अक्षरशः काही गावातील माणसे पाण्यासाठी तडफडत असतात त्यावेळी शेतकरी नांगरणी करून पावसाची वाट पाहत असतात थोडा पाऊस पडल्यावर पेरणी करायला सुरुवात करतात जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया जाते. पावसाचे महत्व हे खरे तर उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना कळते.
काही दिवसानंतर पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांना जो आनंद होतो तेवढा आनंद अन्य कोणत्याच गोष्टीत वाटत नाही कारण त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळालेले असते. आम्ही सर्व मुले देखील पावसाची वाट पाहत असतो कारण पहिल्या पावसात मुलांना भिजायला खूप आवडते एकदा मी अशाच पावसाची वाट पाहत होतो तेव्हा पाऊस अचानक पडला. परंतु मला अभ्यास करायचा होता व तसेच पावसात भिजायचे होते आनंद घ्यायचा होता त्यावेळी माझे मित्र मंडळी माझ्या घरी आल्यावर मला त्यांनी म्हटले चल रे! मित्रा आपण पावसात भिजायला जाऊया यावर मी त्यांना म्हटलं मित्रांनो मला खूप अभ्यास आहे. माझी द्विधा मनस्थिती झाली होती अशावेळी माझे मित्र खूप आग्रह करत होते. आई पण म्हणत होती एवढे तुझे मित्र तुला म्हणत आहे तर तु जा पावसात भिजायला नंतर मी यावर विचार केला तेव्हा माझ्या मनाने मला म्हटले तू जा पावसात भिजायला मग मी मित्रांसोबत पावसात भिजण्याचा आनंद घेतला पावसात भिजल्यावर जो मला आनंद मिळाला तो इतर कुठल्याही गोष्टीतून मला भेटला नसेल. पावसाचे असलेले थेंब थेंब माझ्या शरीरावर जेव्हा पडले त्यावेळी माझे शरीर रोमहर्षित झाले. आनंद फार विलक्षण होता मनातील सर्व वाईट विचार ताणतणाव नष्ट झाल्यासारखे वाटले सुख समाधान याची प्राप्ती झाली एक अलौकिक अनुभव मला आला हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता.
असाच एकदा एक अनुभव गुहागर या ठिकाणी आला. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मी गेलो होतो तेथे वाळूतील असलेली बाईक रायडर समुद्राच्या बाजूने फिरवायला एक वेगळाच आनंद मिळाला बोटिंग करताना एक वेगळीच मज्जा आली बोटिंग करत असताना मी त्या समुद्रातल्या पाण्याला हात लावत होतो त्या पाण्याचा स्पर्श मला जीवनातील खऱ्या आनंदाची अनुभूती देत होता. मनात विचार आला समुद्राच्या टोकापर्यंत जायच असं वाटत होतं इथूनच ढगाला आपल्याला स्पर्श करता येईल मनात खूप उत्सुकता होती त्या बोटिंग द्वारे टोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी केला त्यात मात्र मी अयशस्वी ठरलो. डोळ्यांना झालेला तो आभास होता. जे लांबून दिसले ते खरे नव्हते हा समुद्र खूप विशाल आहे अथांग आहे त्याची परिसीमा कुठेच नाही मला याआधी जे लांब पर्यंत समुद्राचे टोक दिसले परत ते दिसत नव्हते समुद्राच्या लाटा खूप मोठ्याने वर येत होत्या थोडासा मनात मी घाबरलो व बोट चालवणाऱ्या माणसाला सांगितले बोट माघारी घे बोट माघारी घेत असताना तिथे खूप पाऊस पडायला लागला मी त्या पावसात खूप भिजलो त्या पावसाचा आनंद हा फार विलक्षण होता पाऊस पडताना मी जे अनुभवले ते फार अविस्मरणीय होते. मनात एक विचार डोकावून गेला पडणाऱ्या पावसाचे पाणी योग्य पद्धतीने त्याचे संवर्धन केल्यास भविष्यात आपल्याला जगण्यासाठी हेच पाणी उपयोगी पडणार आहे मी हे स्वतः शाळेत व घरात पाण्याविषयी छोटे छोटे उपक्रम स्वतःच राबवतो त्यातून मला एक वेगळाच आनंद मिळतो पाणी हे जीवन आहे आणि या जीवनाचे संवर्धन करण्यात विलक्षण आनंद मला मिळतो.
मी ज्या गावात राहतो. त्या गावात पूरस्थिती निर्माण होते. एकदा तर अचानक असाच हा पाऊस दोन-तीन दिवस सतत धार पडत होता त्यामुळे सगळीकडे भितीयुक्त वातावरण निर्माण झाले होते पुर येणार तर नाही ना? आम्हाला काहीच सुचत नव्हतं अखेर ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले पुराचे पाणी आमच्या गावात शिरले परिसरात अक्षरशः हाहाकार निर्माण झाला. आम्ही तर आमच्या गच्चीवर जाऊन बसलो खाली पाणी वाढत चालले होते घरातील सगळी मंडळी खूप घाबरलेली होती रात्रभर आम्हाला झोप नाही दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला पुराचे पाणी ओसरू लागले आम्हाला याचा खूप आनंद झाला. या पुराच्या पाण्याने अनेकांची घरं उध्वस्त झाली. दुकानातील सामान घरातील सामान असत्या वस्तू सगळीकडे पसरले होते. आमच्या परिसरातील सर्व लोकांना आमच्या परीने त्यांना सहकार्य केले. मनात विचार आला निसर्ग हा फार विलक्षण आहे. वेळप्रसंगी तो आपल्याला हसवतो आनंद देतो तर कधी कधी रडवतो देखील. माणसाच्या नको त्या हस्तक्षेपामुळे निसर्गावर होणारे परिणाम हे आपल्यासाठी देखील घातक करू शकता हे आपण लक्षात घेतले पाहिजे व या निसर्गाला आपल्या घरातील सदस्य समजूनच त्याच्याशी नाते जोडले पाहिजे. या निसर्गातच आपला जन्म झाला आहे आणि या निसर्गातच आपला मृत्यू होणार आहे हे अटळ सत्य आहे.
कुमार स्वराज भाऊराव महानवर इयत्ता दहावी
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) ता. चिपळूण जि. रत्नागिरी