![](https://shikshakdhyey.co.in/wp-content/uploads/2023/08/2-49-1024x1024-1.png)
भारत देश महान
भारत देश महान
आमुचा भारत देश महान,
स्फूर्ती देतील हेच आमुचे
राम, कृष्ण अन हनुमान ॥१॥
काश्मिर ते कन्याकुमारी
दुमदुमली एकच ललकारी,
‘भारत माता की जय’ घोषणा
देत सांडले रक्त या भारत भूवरी ॥२॥
रक्ताने लिहिला आहे
या देशाचा इतिहास,
हसत हसत गेले कैक फासावरी
कवटाळीले त्यांनी मृत्यूस ॥३॥
देश विविध रंगाचा
देश विविध ढंगाचा,
देश विविधता
जपणा-या एकात्मतेचा ॥३॥
डोंगर-दरी कडेकपारी
गीत गातसे झरे निर्झरी,
हसते सृष्टी नवरसधारी
कुठे वेदना तर कुठे उभारी ॥४॥
ना धर्माच्या नावावर मरा
ना धर्माच्या नावावर जगा,
माणूसकी धर्म आहे या देशाचा
फक्त देशासाठीच जगा ॥५॥
का कुणास ठाऊक आजकाल
माझ्या भारत मातेचा गुदमरतोय जीव
जी लेकरं लढली परकीय सत्तेशी
आज तिच एकमेकांशी भांडताना
पाहून कोंडतोय जीव ॥६॥
देशप्रेम फक्त
एका दिवसासाठी नसावं,
ते कायमच
प्रत्येकाच्या मना मनात असावं ॥७॥
उत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला,
विनम्र अभिवादन त्या विरास
ज्यांनी देश स्वातंत्र्य केला ॥८॥
श्री. चंद्रकांत हरिभाऊ खोसे (सहाय्यक शिक्षक)
मोहिते पाटील विद्यालय, मानखुर्द, मुंबई भ्रमणध्वनी: ८१०८४६९६३५