शिकवणारे जगात खूप असतात
पण, खरी शिक्षण देणारी आई असते
सारेच जण समजवणारे असतात
पण, अश्रू पुसणारी आई असते
पाळणा हलवणारे खूप असतात
पण, अंगाई गाऊन निजवणारी आई असते
तिच्या सारखी जगी मुर्ती नाही
आई ती, फक्त आईच असते
पंक्तीत वाढणारे खूप असतात
पण, घास भरवणारी आई असते
बोलणारे खुप असतात जगात
पण, जवळ घेणारी आई असते
पाहणारे खुप असतात मंचावर
पण, कौतुक करणारी आई असते
टाळ्या हजारो वाजवतात
पण, आशिर्वाद देणारी आई असते.
अनुष्का सचिन रणदिवे
शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर बारामती जिल्हा पुणे