पुणे व मुंबईसारख्या महानगरांमधील महाविद्यालयात ११ वी कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत असताना राज्याच्या इतर भागात मात्र उलट परिस्थिती दिसत आहे. दोन वर्षांपासून ११ वी कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३० टक्क्यांनी घटल्याने राज्यातील अनेक प्रस्थापित महाविद्यालयांच्या तुकडय़ांवर संकट कोसळले आहे. आता या तुकडय़ा वाचविण्यासाठी संबंधित संस्था आणि शिक्षकांची धडपड सुरू आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांचा कल कला शाखेकडे जाण्याचा आहे. परीक्षांची तायरी करण्यासाठी इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, तत्त्वज्ञान यासारख्या मानव्यशास्त्रातील विषयांचे असणारे महत्त्व लक्षात घेता मुंबई, पुण्यामधील महाविद्यालयांमध्ये कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात कला शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात असे विद्यार्थी व गोर गरीब विद्यार्थी कला शाखेतच प्रवेश घेऊ इच्छितात. विज्ञान व वाणिज्य शाखेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत असले तरी कला शाखेकडे वळणाऱ्यांचा कल मात्र कमी झाला नाही. नोकरी व करियरच्या भरपूर संधी या शाखेत असल्याने
भारतीय शिक्षण व्यवस्थेत सर्वाधिक विद्यार्थी कला शाखेला प्रवेश घेतात.
कला शाखेचं चित्र गेल्या काही दिवसांपासून बदललं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखांऐवजी कला शाखेचं मेरिट अधिक लागल्याचं पाहायला मिळतं. अभियांत्रिकीमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगल्या नोकरीची संधी मिळण्याची हमी नसल्यानं विद्यार्थ्यांचा ओढा कला शाखेकडे वाढला असल्याचं दिसून आलं आहे.
मानव्यविद्याशास्त्र आणि कला शाखा यांना सारखं समजलं जातं. कला शाखेचे प्रामुख्यानं दोन विभाग करता येतात त्यामध्ये मानव्यविद्याशास्त्र आणि फाईन आर्टस याचा समावेश होतो. मानव्यविद्या शास्त्रांमध्ये भाषा, मानसशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आदीचा समावेश होतो. तर फाईन आर्टसमध्ये नाट्यशास्त्र, शिल्पकला, विज्युअल आर्टस, आदीचा समावेश होतो.
कला शाखेतील बारावी नंतरचे अभ्यासक्रम
बीए
भारतातील प्रत्येक विद्यापीठातून आर्टस शाखेतील पदवीचं शिक्षण घेता येऊ शकतं. विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये देखील अर्ज दाखल करता येतात. भाषा विषय आणि सामाजिक शास्त्रांतील विषयांमध्ये पदवी पूर्ण करु शकतात. मुंबईतील विल्सन कॉलेज, के सी कॉलेज, रुईया कॉलेज, साठ्ये कॉलेज तर पुण्यात फर्ग्यूसन कॉलेज, गरवारे, मॉडर्न , सिम्बॉयसिस महाविद्यालयात कला शाखेच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची पसंती असते.
बीएएलएलबी
बीए आणि कायद्याचं शिक्षण एकत्रित घ्यायचं असल्यास बीएएलएलबी हा एक चांगला पर्याय आहे. बारावी कला शाखेचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास एमएचसीईटी, क्लॅट, लॉसीईटी द्यावी लागते. मात्र, विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत 50 टक्के गुण मिळालेले असणं आवश्यक आहे.
इतर अभ्यासक्रम
बॅचलर ऑफ हॉस्पिटीलीटी मॅनेजमेंट, बॅचरल फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, हॉटेल मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग
कला शाखेचे फायदे कला शाखेच्या अभ्यासक्रमातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकांच्या परीक्षांच्या तयारी करताना फायदा होतो.
प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, नागपूर ९५६१५९४३०६