लहान थोर सारेजण
वेड लागले इंटरनेटचे
अंगठे फिरतात भराभर
ज्ञान मिळते चोहिकडचे…
आजकालची तरूण पिढी काय किंवा लहान मुले काय ? सारी सारखीच …सर्वांच्या हातात एक खेळणे असते. त्याचे नाव मोबाईल. यावर सर्व जगाचे ज्ञान अवगत होते.
किबोर्डवर बोटे फिरताच
ज्ञानाचे भांडार खुले होते
यू ट्युब वर सर्च करताच
जे हवे ते मिळून जाते..
नवनवीन ऍप प्लेस्टोअर मधून डाऊनलोड केले की शैक्षणिक माहिती, सामाजिक माहिती, बौद्धिक खुराक, कविता इत्यादीचे ज्ञान मिळते.
जगात काय चाललेय याचे अचूक ज्ञान मिळते.
बातम्या आपण आत्तापर्यंत वर्तमानपत्रात वाचत होतो. आज वर्तमानपत्रच डिजिटल झालेय. याचा लाभ ही तरूण पिढी करून घेते. नोकरीमुळे या मुलांना घरी वेळ मिळत नाही बारा बारा तास नोकरीच्या ठिकाणी असतात. अशा वेळी डिजिटल तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होतो.
पण हीच तरूणाई जर तंत्रज्ञानाच्या वाईट नादाला लागली तर आख्खी पिढी बरबाद होताना दिसते.
काही न बघण्यासारखे व्हिडिओ पाहून तरूणाई चलबिचल होतेय. यातूनच अत्यंत घृणास्पद काम तरूणाईकडून होताना दिसते.
तसेच मुलींची फॅशन या चित्रपटांच्या व्हिडिओमुळे बळावली आहे. त्यातूनच ही पिढी जरा बिनधास्त वागतेय. पण हे सर्व हानिकारक होत चाललेय.
हल्ली व्हाटसअप्प या सोशल मिडियामुळे अनेक चांगल्या बाबी होतानाही दिसतात. अनेक चांगले समूह आसतात. ऍडमिन छान काळजी घेतात समूहाची. शिस्त अगदी कडक असते.
सोशलमिडिया छान आहे त्याचा योग्य वापर केला तर आजची तरूणाई गगनभरारी नक्कीच घेईल. समाजातही उच्च नाव कमवतील. आई बाबांचे नाव उंचावतील.
मुले अपडेटेड माहितीमुळे सदैव अपडेट राहतात, सर्व सुविधांचा उपयोग घेतात. काही ठिकाणी याचा अतीवापर केल्याने या भौतिक सुखांची सवय होते.माणूस प्रगती तर करतोय पण अती वापरामुळे त्याची अधोगती होऊ नये ही इच्छा!
या सुविधांचा वापर योग्य करा तरूणांनो,आणि जीवनाचा आनंद उपभोगा.योग्य त्याची निवड करा. आपल्या बरोबर इतरांनाही पुढे घेऊन जा. भारताचे नाव जगात मोठे करा.
लावा झेंडा अभिमानाचा
लावा झेंडा स्वकर्तृत्वाचा
आपला भारत देश महान
देशाचा बाळगूया स्वाभिमान..
वसुधा वैभव नाईक, पुणे 9823582116