Chat GPT तंत्रज्ञानाचे भविष्य?

सध्या Chat GPT  नाव सारखे ऐकण्यात येत आहे. अतिशय वेगाने जबरदस्त क्रांती घडवून आणलेली आहे, याचा उपयोग अनेक क्षेत्रांमध्ये होत आहे. चॅट जीपीटी याच्या नावातच  चॅट हा शब्द आहे म्हणजे यामध्ये चॅटिंग करता येते व आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो. हे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence (AI) चे उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला गुगल असिस्टंट माहित आहे ते देखील आपल्याला मदत करते तसेच Chat GPT काम करते. पण फक्त लिखित स्वरूपातच उत्तर देते Chat GPT अर्थात Chat Generative Pre-trained Transformer.

Generative : निर्माण करतो

Pre-trained : पूर्व प्रशिक्षित

Transformer : दिलेला मजकूर समजून घेणारे लर्निंग मॉडेल

       याला आपण आपले प्रश्न विचारू शकतो व ते आपल्याला त्याची अचूक आणि स्पष्ट उत्तरे देण्याचा प्रयत्न करते. Google वर जर आपण एखादा प्रश्न विचारला तर तेथे आपल्याला थेट उत्तर मिळत नाही तर आपल्याला Google काही वेबसाइट्स, ब्लॉगस्पॉट्स किंवा लिंक प्रदान करते. मग आपण त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरे मिळतात परंतु Chat GPT मध्ये प्रश्नांची थेट उत्तरे लेखी स्वरूपात मिळतात.

Chat GPT ला Open AI ने विकसित केले आहे. हे एक प्रकारचे चॅट बॉट आहे. याची सुरुवात 30 नोव्हेंबर 2022 रोजी Open AI चे सीईओ सॅम ओल्टमन आणि एलोन मस्क यांनी केली.

मोबाईलवर ChatGPT कसे वापरावे?

Step I : आपल्या मोबाईलमधील वेब ब्राउझर ओपन करावे जसे Google Chrome.

Step II : ब्राउझरच्या ऍड्रेस बॉक्समध्ये  https://chat.openai.com  हा एड्रेस टाका. त्यानंतर Open AI च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा. तिथे Login आणि Sign up असे दोन पर्याय दिसतील.

Step III : पहिल्यांदा वापर करीत असल्यामुळे Sign up वर क्लिक करा. तिथे ई-मेल आयडी किंवा मायक्रोसॉफ्ट अकाउंट किंवा गुगल अकाउंट ने खाते तयार करू शकतो.

Step IV : जर Continue With Google वर क्लिक केले तर ताबडतोब खाते तयार होते.

Step V : यानंतर समोर एक पर्याय दिसेल ज्यामध्ये स्वतःचे नाव टाकून Continue वर क्लिक करा.

Step VI :  जो मोबाईल नंबर एंटर केलेला आहे त्यावर सहा अंकी ओटीपी मिळेल तो टाकून मोबाईल नंबरची पडताळणी करून घ्या.

Step VII : आता Chat GPT वर यशस्वीरित्या खाते तयार झालेले आहे. त्यामध्ये अर्थात चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारल्यानंतर लगेच त्याचे उत्तर मिळते.

 उदाहरण :

1.    माझी शाळा यावर निबंध तयार करा.

2.    युट्युब वर विज्ञानाचा शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी स्क्रिप्ट तयार करा.

3.    संगणक म्हणजे काय ?

4.    मायक्रोसॉफ्ट पावर पॉइंट कसे वापरावे ?

         अशाप्रकारे विविध प्रश्न चॅट बॉक्समध्ये टाईप केल्यानंतर आपल्याला त्यांची समाधानकारक उत्तरे मिळतात.

Chat GPT तंत्रज्ञानाचे फायदे :

1.    युट्युब वर व्हिडिओ अपलोड करायचा असेल त्यासाठी डिस्क्रिप्शन किंवा स्क्रिप्ट तयार करता येते.

2.    याचा उपयोग प्रभावी अध्यापन करण्यासाठी करू शकतो.

3.    वेगाने ड्राफ्टिंग करता येते.

4.    पाठ्य घटकावर प्रश्नपत्रिका तयार करणे.

5.    निबंध, कथा, पत्रलेखन, अर्ज तात्काळ तयार करता येतात.

6.    सध्या हे सर्व विनामूल्य आहे. Chat GPT ने तयार करून दिलेल्या घटकाबद्दल समाधान झाले असेल किंवा नसेल यावर प्रतिक्रिया देता येते, त्यानुसार तेथे डेटा अपडेट होतो.

Chat GPT तंत्रज्ञानाचे तोटे :

1.    दिलेले उत्तर शंभर टक्के अचूक असेलच असे नाही.

2.    असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरे मिळत नाहीत.

3.    सध्या हे मोफत आहे परंतु भविष्यात यासाठी पैसे मोजावे लागतील.

4.    या टुलकडे 2021 पर्यंतचा डेटा फीड आहे त्यामुळे 2021 नंतरच्या चालू घडामोडी किंवा माहिती मिळणार नाही.

लेखिका ज्योती गणपतराव गादगे

सहशिक्षिका, शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,
बोरतळा पाटी, ता. उदगीर  जि. लातूर 9623510962

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button