ढग आले दाटुनी,
काळोख अंधारला.
बरसले नभ गर्जूनी,
वाट दिली धारेला.
विटूनी गेलेले मन,
आनंदाचे झाले धन.
या मंद गार लहरींनी,
भू मातेचे केले वंदन.
सुखावल्या ह्या चारही दिशा,
प्राणी मात्राही झाले वेडेपिसे.
आनंदुनी गेली ही धरणी माता,
आता कशातही उरली नाही गाथा.
निसर्गाचा हा चमत्कार पृथ्वीवरी,
का बाळगावे चिंतन उरावरी.
ढगांनी केली वाट,
जशी धरणीतूनी.
तशी डोळ्यांनी केली वाट अश्रूंनी.
मनाचेही झाले आता ओझे दूर,
निसर्गही नाचू लागला सर्वदूर.
सारिका भदाणे, नाशिक, ९५१८५८२७३९